युरोपमधील वातावरण काही केल्या शांत होताना दिसत नाहीए.
सप्टेंबरच्या अखेरपासून फ्रान्समध्ये सुरु झालेलं आंदोलनांचं लोण युरोपभर पसरलं असून
विद्यार्थ्यांसह आता विविध समाजघटक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलन करत आहेत. जर्मनीच्या बर्लिनमध्ये तर जेन झी रस्त्यावर उतरले आहेत.