राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढताना दिसतोय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमानाचा पारा घसरला असून पहाटे आणि रात्री गारठा अधिक जाणवू लागला आहे. काही ठिकाणी किमान तापमान दहाच्या खाली गेल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.