Global News| SpaceX च्या हाती मोठं यश, 15 व्या चाचणीत स्टारशिप लॉन्चिंग पॅडवर परतलं

अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला अंतराळ क्षेत्रात मोठं यश मिळालंय. शनिवारी स्पेसएक्सच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट ‘स्टारशिप 15 यशस्वीपणे पृथ्वीवर उतरलंय. लॉन्चिंग बेसवर ते यशस्वीपणे उतरलं. हे रॉकेट 14 नोव्हेंबर रोजी स्टारबेसवरून उड्डाण करून कक्षेत गेले आणि 26 स्टारलिंक V3 उपग्रह तैनात केले. त्याने पृथ्वीभोवती 14 प्रदक्षिणा घातल्या आणि सुमारे 22 तास पृथ्वीच्या कक्षेत राहिले. त्यानंतर रविवारी ते त्याच्या मूळ टॉवरवर सुरक्षितपणे उतरलं. चॉपस्टिक आर्म्स म्हणजेच दोन मोठ्या रोबोटिक हातांनी या रॉकेटला पकडले.

संबंधित व्हिडीओ