Marathwada Drought| मराठवाड्यात दुष्काळाचं उग्र रूप, पैठणमधील तांबे डोणगाव तांड्यावर विदारक वास्तव

मराठवाड्यात दुष्काळाने आता उग्र रूप धारण करायला सुरुवात केलीये...छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव तांड्यावरून एक चटका लावणारं वास्तव समोर आलंय... उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच इथल्या विहिरी आणि बोअरवेल कोरड्याठाक पडल्यात, पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ निर्माण झालाय...पाणी नाही आणि हाताला काम नाही, अशा दुहेरी संकटात नागरिक सापडलेत... त्यामुळे अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी ऊस तोडणीच्या कामासाठी स्थलांतर करतायत, गावात घरांना कुलपं लागलेली पाहायला मिळतायत...या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी

संबंधित व्हिडीओ