परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सोमनाथच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असताना, पोलिसांनी 'अज्ञाताविरुद्ध' खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.