#Solapur #CentralTeam #CropDamage #Farmers अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेले केंद्र सरकारचे पथक सोलापूरमध्ये चांगलेच वादात सापडले आहे. या पथकाने रात्रीच्या अंधारात, बॅटरीचा वापर करत शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. रात्रीच्या वेळी नेमके काय नुकसान दिसणार, असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आणि विरोधकांनी या पाहणीवर जोरदार टीका केली आहे. सोलापुरातील या 'रात्रीस खेळ चाले' पाहणीचा स्पेशल रिपोर्ट.