#BMCElection #MunicipalCorporationPolls #MaharashtraPolitics राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे! गेल्या साडेतीन वर्षांपासून राजकीय पक्षांना असलेले वेध लवकरच पूर्ण होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची (BMC) निवडणूक १५ जानेवारी २०२६ पर्यंत होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महापालिका निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत निघणार आहे, ज्यामुळे कोणत्या नगरसेवकाचा वॉर्ड राखीव होणार आणि कोणाचा सुरक्षित राहणार, याची धाकधूक वाढली आहे.