#PrakashSurve #Marathi #Hindi #NorthIndia शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठीपेक्षा हिंदी भाषेला प्राधान्य देणारे अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. "मराठी आई मरो पण उत्तर भारतीय मावशी जगो" अशी वल्गना त्यांनी केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्रातील आमदाराने मराठी भाषेबद्दल असे विधान केल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच शिंदे गटाच्या आमदारांचे उत्तर भारतीय मतदारांवरील प्रेम का उफाळून येते? या विधानामागची राजकीय कारणे काय आहेत? या संवेदनशील मुद्द्यावर आणि प्रकाश सुर्वे यांच्या भूमिकेवर सविस्तर माहिती पाहुयात या रिपोर्टमधून.