Thane Pradeep Purnekar| प्रदीप पूर्णेकरांची हत्या; मीनाक्षी शिंदेंच्या नावाची FIR मध्ये नोंद

ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनं आज ठाणं हादरलं... प्रदीप पूर्णेकर यांची ६ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं हजारो लोकांचा जमाव पोलीस ठाण्याबाहेर उभा राहिला..यानंतर आदित्य ठाकरे , संजय राऊतांनी पोलिसांसोबत संवाद साधला. मीनाक्षी शिंदे यांचं नाव एफआयआरमध्ये दाखल करावं अशी प्रमुख मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी केली.. याच मागणीला दुजोरा देत संजय राऊतांनी ही मागणी पूर्ण करण्याचा इशारा दिला.. दरम्यान FIRमध्ये मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचं नाव FIRमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राम पुर्णेकर यांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ