Nagpur | देशापेक्षा काहीचं मोठं नाही; तुर्की-अझरबैजानची बुकिंग ट्रॅव्हल एंजटकडून रद्द | NDTV मराठी

ऑपरेशन सिन्दुर नंतर पर्यटन क्षेत्रात आता त्याचे पडसाद उमटत आहेत. अझरबैजान आणि तुर्कीये या पाक समर्थक दोन देशांना एक वेगळ्या पद्धतीने फटका बसला आहे. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात टी ए ए आय ही भारतातील पर्यटन विषयक एजंट्स ची सर्वात मोठी संघटना असून तिच्या तर्फे अझरबैजान आणि तुर्कीये या दोन देशांसोबत पर्यटन विषयक संबंधांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पर्यटकांनी या देशांच्या बुकिंग केल्या आहेत त्यांच्या बुकिंग रद्द करण्यात येत असून त्यांना अन्य देशात वळते करण्यासाठी कौन्सिलिंग करण्यात येत आहेत. ही संकल्पना ज्यांनी मांडली त्या राजू अकोलकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..

संबंधित व्हिडीओ