Uday Samant Shimga | गावच्या शिमगोत्सवात उदय सामंतांनी लुटला ढोल आणि ताशा वाजवण्याचा आनंद | NDTV मराठी

गावच्या शिमगोत्सवात मंत्री उदय सामंत यांनी ढोल आणि ताशा वाजविण्याचा आनंद लुटला.कोकणातील शिमगोत्सव पाहण्यासाठी आमदार शरद सोनावणे यांचीही उपस्थिती. आयुष्यात पहिल्यांदाच मी शिमगोत्सव अनुभवला, इथला शिमगा काही वेगळाच - सोनावणे.कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगोत्सव. राजकिय नेते मंडळींना देखील या सणाची ओढ लागलेली असते. दरम्यान राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील रत्नागिरीतल्या आपल्या पाली या गावी अगदी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे शिमगोत्सवात सहभागी होत या सणाचा आनंद लुटला. होळीच्या वेळी त्यांनी ढोल आणि ताशा वाजवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे आमदार शरद सोनवणे हे देखील कोकणातील होळी, शिमगोत्सव पाहण्यासाठी उदय सामंत यांच्याबरोबर आवर्जून हजर राहिले.

संबंधित व्हिडीओ