DJ च्या दणदणाटावर मंगळवारी तातडीची सुनावणी, खंडपीठाकडून सुमोटो याचिका दाखल

राज्यभरात सण उत्सव काळात सुरू असलेल्या तीव्र ध्वनी प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून गंभीर दखल घेतली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेत राज्याच्या महाधिवक्त्यांना पाचारण केलं.. आमचा कोणत्याही धर्माला किंवा सणाला विरोध नाही, मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये, असं हायकोर्टाने म्हटलंय... त्याचबरोबर ध्वनी प्रदूषणाचे नियम काय? त्याची अंमलबजावणी होते का? नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई? याचा सविस्तर तपशील उद्या मंगळवारी सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.. Urgent hearing on Tuesday regarding the blaring DJ music; Division Bench registers suo motu petition.

संबंधित व्हिडीओ