नाशिकमध्ये 35 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी ईदगाह मैदानापासून शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढला.. गेल्या काही वर्षात आदिवासी आश्रम शाळा आणि वसतीगृहामध्ये सहाशेहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले असून त्यांना कॅन्डल मार्चच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास मंत्री असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. 28 सप्टेंबरला याच प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी मुंबईला देखील धडकणार आहेत..