पु्ण्यात गणेशविसर्जनावरून नेहमीच वादाचं वातावरण असतं. अशीच काही परिस्थिती यावर्षी देखील पाहायला मिळू शकते.कारण गेल्या अनेक वर्षांपासून गणेश विसर्जनासाठी लक्ष्मी रोडवरून जाणाऱ्या तब्बल गणेश मंडळांना परवानगी नाकारण्यात आलीय.. पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय.. या संदर्भात गणेशमंडळांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून निवेदन दिलं. विसर्जन मिरवणुकीवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येतंय..