विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याअंतर्गत पिरकुंडा दर्ग्याच्या मागे एका सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं आढळल्याने खळबळ उडाली.होळीच्या दिवशीच महिलेचं मुंडकं असलेली सुटकेस आढळून आली.होळीसाठी स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते. यावेळी त्यांना एक सुटकेस आढळून आली.महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे सुटकेसमध्ये घालण्यात आले.त्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे.याप्रकरणी मांडवी पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान उभं राहिलंय.