
Marathi language : संज्ञापनाची अनेक माध्यमं आहेत. भाषा, स्पर्श, दृश्य, ध्वनी, लेखन... वगैरे वगैरे. अश्वयुगापासून आतापर्यंत या संज्ञापनांच्या माध्यमात अनेक बदल होत गेले. त्यातही अनेकार्थाने प्रगत होत गेलेलं मौखिक माध्यम म्हणजे भाषा. आताच्या जगात भाषेशिवाय जगण्याची कल्पनाच आपण करू शकत नाही.
सध्या राजकीय वर्तुळात मराठी भाषेवरुन सुरू असलेला वाद आपण पाहतच आहोत. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी भाषा यायलाच हवी अशी मनसेची भूमिका आहे. मराठी भाषा शिकली नाही, किंवा तिचा अपमान केला तर तुमची रवानही मूळ गावी केली जाईल अशी तंबी आणि कधी कधी फटके पण दिले जातात. ठाकरे गटाने तर मराठी भाषेची शिकवणीच सुरू केली आहे. त्यात नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र हीच मराठी भाषा जेव्हा दिल्लीत जाऊन पोहोचते तेव्हा काय अवस्था होत असेल, माहिती आहे? 1300 किलोमीटर लांब दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला मराठीतील शब्द तरी ओळखता येतो का? Because, Why Not? या युट्यूब चॅनलने दिल्लीत जाऊन तिथल्या नागरिकांची मराठी भाषेची परीक्षा घेतली. त्यावेळी बऱ्याच गमती-जमती घडल्या. समोरच्या व्यक्तीला तुमची भाषा येत नसेल तर तो तुमची थट्टा करू शकतो, खिल्ली उडवू शकतो, तुम्हाला डेकूणही म्हणू शकतो. अगदी, 'तुला चापटवेन' अशी धमकीही देऊ शकतो.
नक्की वाचा - School news: 'शाळेत शिवी द्याल तर या पुढे...', काय आहे 'शिवी मुक्त शाळा' अभियान?
या व्हिडिओमध्ये दोन तरुणांनी दिल्लीकरांना मराठीतून प्रश्न विचारले. प्रश्न अगदी क्षुल्लक होते..मला आंघोळ कुठे करता येईल, तांदूळ कुठे मिळतो, पाटी कुठे मिळेल, चुलीवरचं जेवण कुठे मिळेल, उकळलेले बटाटे कुठे मिळतील, अगदीच दप्तर कुठे मिळेल?, कासव पाळायचं आहे, कुठे मिळेल.. मात्र दुर्दैवाने दिल्लीकर या परीक्षेत सपशेल नापास झालेत. भाषा येत नसल्याने तरुण मजेमजेत त्यांना बरंच काही बोलून पण गेला. शेवटी दिल्लीकरांनी हे सर्व हसण्यावारी नेलं आणि हे सर्व हसण्यासाठीच होतं.
पण समोरच्याची भाषा येत नसेल तर अनेक गमती-जमती घडू शकतात, हे नक्की.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world