जाहिरात

Trending News : 22 वर्षांच्या तरुणीचा सोसायटीतील काकांना दणका, चक्क 62 लाखांचा ठोकला दावा; काय आहे प्रकरण?

Trending News : एका बावीस वर्षांच्या तरुणीने तिच्या घरातील शांततेत व्यत्यय आणणाऱ्या आणि विनाकारण त्रास देणाऱ्या सोसायटीतील काकांना असा काही धडा शिकवला आहे की त्याची चर्चा आता सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे.

Trending News : 22 वर्षांच्या तरुणीचा सोसायटीतील काकांना दणका, चक्क 62 लाखांचा ठोकला दावा; काय आहे प्रकरण?
Trending News : या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मुंबई:

Trending News : एका बावीस वर्षांच्या तरुणीने तिच्या घरातील शांततेत व्यत्यय आणणाऱ्या आणि विनाकारण त्रास देणाऱ्या सोसायटीतील काकांना असा काही धडा शिकवला आहे की त्याची चर्चा आता सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे. स्वतःच्याच घरात मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या या तरुणीला जेव्हा काही हौशी सदस्यांनी बाहेर काढण्याची धमकी दिली, तेव्हा तिने चक्क 62 लाख रुपयांचा दावा ठोकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

'त्या' रात्री नक्की काय घडलं?

ही घटना बंगळुरू येथील एका अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री घडली. संबंधित तरुणी आपल्या घरी पाच मित्रांसोबत गप्पा मारत होती. तिथे कोणताही मोठा आवाज नव्हता किंवा कोणतीही पार्टी सुरू नव्हती, तर ते सर्वजण मिळून जेवण बनवत होते. 

इतक्यात सोसायटीतील एका काकांनी दरवाजा ठोठावला आणि बॅचलर्सना येथे परवानगी नाही असे सांगत मालकाचा नंबर मागितला. त्यावर त्या तरुणीने मीच या घराची मालकीण आहे आणि तुम्हाला याच्याशी काहीही देणेघेणे नाही असे स्पष्ट शब्दांत सुनावले.त्यामुळे वादाला सुरुवात झाली.

( नक्की वाचा : Nostradamus: 2026 मध्ये मृत्यू बनून येणार मधमाश्या? नास्त्रेदमसच्या त्या एका भविष्यवाणीने वाढवली जगाची धडधड )

घरात जबरदस्तीने प्रवेश आणि वाद

काही वेळातच चार ते पाच पुरुष त्या तरुणीच्या घरात परवानगीशिवाय शिरले. त्यांनी तिथे दारू आणि ड्रग्जचे सेवन सुरू असल्याचा खोटा आरोप केला आणि तिला दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करण्याची ताकीद दिली. यावेळी तरुणीच्या मित्रांनी मध्यस्थी करत त्या पुरुषांना घराबाहेर ढकलले. 

या झटापटीत विनापरवाना घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या कानशिलातही लगावण्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सोसायटीच्या त्या सदस्यांनी पोलिसांना पाचारण केले.

( नक्की वाचा : Geetanjali Kulkarni : मुल नको असं का वाटतं? Gullak ची अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीनं दिलं रोखठोक उत्तर )

कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगने फिरवली सूत्रे

पोलीस आल्यावर त्यांनी घराच्या कागदपत्रांची मागणी केली, मात्र कोणताही त्रास दिला नसताना पोलिसांनी घरात येणे किंवा कागदपत्रे मागणे चुकीचे असल्याचे सांगत तरुणीने नकार दिला. 

या तरुणीच्या वडिलांनी सुरक्षिततेसाठी तिच्या हॉलमध्ये एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला होता, ज्यामध्ये या सर्व लोकांचा प्रताप रेकॉर्ड झाला होता. हेच फुटेज तिने नंतर सोसायटीचे चेअरमन आणि बिल्डरला दाखवले. त्यानंतर तात्काळ कारवाई करत त्या सदस्यांना पदावरून हटवण्यात आले आणि प्रत्येकी 20,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला.

मोठ्या नुकसानभरपाईची मागणी

सोसायटीच्या अंतर्गत कारवाईवर ही तरुणी थांबली नाही. तिने आपल्या वकिलामार्फत त्या सदस्यांना आणि सोसायटीला कायदेशीर नोटीस धाडली. घरामध्ये अनधिकृत प्रवेश, छळ आणि हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिने 62 लाख रुपयांच्या भरपाईचा दिवाणी दावा दाखल केला आहे. 

भारतामध्ये एवढी मोठी रक्कम मिळणे कठीण असले तरी, त्यातील 10 ते 12 टक्के रक्कम मिळाली तरी ती अशा लोकांसाठी मोठी शिक्षा असेल असे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. या धाडसी पावलामुळे आता त्या सोसायटीतील काकांची बोलती बंद झाली असून नेटिझन्स या तरुणीचे कौतुक करत आहेत.

या तरुणीची संपूर्ण पोस्ट इथं वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com