जाहिरात

लग्नानंतर फक्त 3 मिनिटांमध्ये नवरीनं घेतला घटस्फोट, नवऱ्याला 'ती' चूक भोवली

3 minutes marriage : ज्या ठिकाणी तिचं 3 मिनिटांपूर्वी लग्न झालं होतं, तिथंच ती घटस्फोट घेऊन नवऱ्यापासून वेगळी झाली.

लग्नानंतर फक्त 3 मिनिटांमध्ये नवरीनं घेतला घटस्फोट, नवऱ्याला 'ती' चूक भोवली
मुंबई:

लग्न हे जन्मोजन्मीचं नातं मानलं जातं. आपल्या देशात सात जन्म एकच पती मिळू दे म्हणून विवाहित महिला उपवास करतात. अनेक जोडपी जन्मभर हे नातं जपतात. तर काहींना ते नातं तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणात या जोडप्यानं लग्न केलं. सर्वजण हसत, आनंदात रजिस्टर ऑफिसमधून बाहेर पडत होते. त्यावेळी नवऱ्याच्या तोंडून निघालेला एक शब्द निघाला त्यामुळे नवरी प्रचंड भडकली. ती थेट रजिस्टर ऑफिसमध्ये गेली. ज्या ठिकाणी तिचं 3 मिनिटांपूर्वी लग्न झालं होतं, तिथंच ती घटस्फोट घेऊन नवऱ्यापासून वेगळी झाली. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

कुवेतमधील 3 मिनिटांच्या लग्नाची सध्या जगभर चर्चा आहे. 'मेट्रो' नं दिलेल्या वृत्तानुसार या जोडप्यानं अधिकृत पती-पत्नी झाल्यानंतर फक्त 3 मिनिटांमध्येच घटस्फोट घेतला. नवऱ्याच्या तोंडून निघालेल्या एका शब्दामुळे नवरी प्रचंड नाराज झाली. त्यानंतर तिनं थेट काडीमोड घेतला.

ही घटना 2019 मधील आहे. पण, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. कोर्टात लग्नाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर हे जोडपं बाहेर येत होतं. त्यावेळी ही नवरी चालताना अडखळली आणि खाली पडली. त्यावर नवऱ्यानं हसत-हसत तिची थट्टा करताना तिला 'मूर्ख' म्हंटलं. मूर्ख हा शब्द ऐकताच नवरीचा संताप अनावर झाला. ती पुन्हा कोर्टात गेली आणि तिनं घटस्फोटाचा अर्ज केला. कोर्टानं तिची विनंती मान्य करत तिला घटस्फोट दिला. 'सर्वात लहान लग्न' असं या प्रकाराचं वर्णन केलं जात आहे.

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )
 

या प्रकरणावर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'मी एका लग्नाला गेलो होतो. त्या लग्नात नवऱ्यानं सर्वांसमोर नवरीचा अपमान केला. त्या नवरीनंही त्याला घटस्फोट द्यायला हवा होता,' असं मत एका युझरनं व्यक्त केलंय. 'तो सुरुवातीपासूनच असं वागत असेल तर त्याला सोडून दिलेलं बरं,' असं म्हणत आणखी एका व्यक्तीनं नवरीचं समर्थन केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Lord Jagannath Temple : 1978 नंतर पहिल्यांदाच जगन्नाथाचं रत्नभांडार उघडलं, किती सोनं आढळलं?
लग्नानंतर फक्त 3 मिनिटांमध्ये नवरीनं घेतला घटस्फोट, नवऱ्याला 'ती' चूक भोवली
hardik-pandya-comments-on-natasa-stankovic-latest-post-son-agastya-after-divorce
Next Article
घटस्फोटानंतरही प्रेम कायम! नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया Viral