
Diwali Viral Gift: दिवाळी सणानिमित्त कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानत असतात. कर्मचाऱ्यांना देखील कंपनी काय भेट देणार याची दरवर्षी उत्सुकता असते. अनेक कंपन्यांनी अद्याप त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिलेल्या नाहीत. मात्र एक कंपनी आहे, जिने कर्मचाऱ्यांना दिलेली भेट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांना कंपनी नेमकी कोणती आहे. अनेकांनी तर या कंपनीत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
भेटवस्तूमुळे व्हायरल झालेली कंपनी कोणती?
अनोख्या भेटीमुळे इंफोएज (InfoEdge) ही कंपनी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून हिरव्या रंगाची एक मोठी सूटकेस दिली आहे. या भेटीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. या कंपनीची स्थापना 1995 मध्ये संजीव बिखचंदानी यांनी केली होती. कंपनीकडे अनेक लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत, ज्यात Naukri.com, 99acres.com, Jeevansathi.com आणि Shiksha.com यांचा समावेश आहे. नोएडा येथे कंपनीचं मुख्यालय आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?
या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, ऑफिसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर हिरव्या रंगाची मोठी सूटकेस आणि एक गिफ्ट हॅम्पर ठेवलेले दिसत आहे. एका कर्मचाऱ्याने व्हिडिओमध्ये ही भेट उघडून दाखवली आहे. ज्यात एक मोठी सूटकेस आणि त्याच रंगाची तिच्या आत ठेवलेली एक छोटी ट्रॉली आहे. योगा बारचा हॅम्पर आणि आरती करण्यासाठी एक दिवा आहे.
कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी भेट दिल्याने इंफोएज कंपनीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेक युजर्सने 'आमच्या ऑफिसमध्ये असे गिफ्ट का मिळत नाही?' अशा प्रतिक्रिया देत कंपनीचे कौतुक केले आहे.
कर्मचाऱ्यांचा उत्साह
कर्मचाऱ्यांनी ही भेट मिळाल्यानंतरचा आपला आनंद आणि उत्साह व्हिडिओमध्ये व्यक्त केला आहे. ही केवळ भेटवस्तू नसून, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत, असे मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world