जाहिरात

Instagram वर मुस्लीम मुलीचं हिंदू तरुणीसोबत जडलं प्रेम, लग्नाचा निर्णय घेताच कुटुंबीयांची सटकली अन्..

जयपूरची हिंदू तरुणी तिच्या मुस्लिम प्रेयसीला मिळण्यासाठी मेरठला पोहोचली.दोघींनीही लग्न करण्याचं ठरवलं.पण कुटुंबीयांना या प्रेमप्रकरणाबाबत कळल्यानंतर मोठी खळबळ उडाली.आता याप्रकरणात पोलिसांनीही उडी घेतली आहे.

Instagram वर मुस्लीम मुलीचं हिंदू तरुणीसोबत जडलं प्रेम, लग्नाचा निर्णय घेताच कुटुंबीयांची सटकली अन्..
Muslim Girl And Hindu Girl Love Story

Hindu-Muslim Viral Love Story : इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री प्रेमात बदलली आणि दोघींनीही लग्न करण्याचा पक्का निश्चय केला.पण या कहाणीत प्रियकर आणि प्रेयसी नाही,तर दोन तरुणी आहेत. प्रेम मिळवण्याचा हट्ट असा डोक्यावर चढला की, जयपूरची हिंदू तरुणी तिच्या मुस्लिम प्रेयसीला मिळण्यासाठी मेरठला पोहोचली.दोघींनीही लग्न करण्याचं ठरवलं.पण कुटुंबीयांना या प्रेमप्रकरणाबाबत कळल्यानंतर मोठी खळबळ उडाली.आता याप्रकरणात पोलिसांनीही उडी घेतली आहे.

हे प्रकरण मेरठच्या सरधना पोलीस स्टेशन परिसरातील मुल्हैड गावातील आहे. इथे राहणाऱ्या मुस्लीम मुलीची जयपूरच्या तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री झाली.दोघींमध्ये मैत्री वाढत गेली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.दोघीही एकमेकिंना लपून भेटायच्या आणि संवाद साधायच्या. विषय एवढा वाढला की, दोघींनी जीवन मरणाच्या शपथी घेतल्या.मेरठची तरुणी मुस्लिम आहे.तर जयपूरची तरुणी हिंदू. सुरुवातीला धार्मिक अडथळे आले. पण त्यानंतर दोघींनी लग्न करण्याचा निर्णय घेत ऐकमेकींसोबत एकत्र राहण्याच्या शपथ घेतली. 

नक्की वाचा >> Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार

तरुणीने कुटुंबीयांसमोर ठेवला लग्नाचा प्रस्ताव

प्रेमात पडलेली जयपूरच्या हिंदू तरुणीने हिम्मत दाखवली आणि ती जयपूरहून एकटी मेरठला पोहोचली.तेथून ती सरधनाच्या मुल्हैडा गावात पोहोचली. जेव्हा ती तिच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली.तेव्हा दोघींचं बोलणं झालं. पण तेव्हा जयपूरच्या तरुणीने कुटुंबीयांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली. मुस्लीम तरुणीसोबत जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या लोकांनी विचारलं,तेव्हा त्यांनी स्पष्ट म्हटलं की, आम्हाला दोघींना लग्न करून वेगळं राहायचं आहे. 

नक्की वाचा >> Nida Khan: 42 दिवसांपासून गुंगारा देणारी निदा खान कशी सापडली? AIMIM चा 'तो' नेता कसा अडकला? वाचा आतली खबर

एकमेकांसोबत जगणार आणि मरणार

याप्रकरणाबाबत कुटुंबीयांनी मोठा राडा केला. सरधना के मुल्हैडा गावात पोलिसही पोहोचले.कुटुंबीय आणि पोलिसांनी मिळून दोघींना खूप समजावलं.पण दोघीही लग्नाच्या मागणीवर ठाम राहिल्या. अखेर पोलिसांनी दोघींना पोलीस स्टेशनमध्ये नेलं.तासनतास चौकशी केली गेली. पण कोणताही तोडगा निघाला नाही.जयपूरच्या तरुणीने स्पष्ट म्हटलं की, ती तिच्या प्रेयसीशिवाय जिवंत राहू शकत नाही. आम्ही एकत्र जीवन मरण्याची शपथ घेतली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com