Indian Woman's Cricket Team Fan Video: महिला वर्ल्ड कपच्या फायनल(Women's World Cup Final 2025) मॅचमध्ये टीम इंडियाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे तसेच विजयानंतरचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातीलच एका व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. टीम इंडियाच्या एका छोट्या फॅनने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. टीम इंडियाच्या छोट्या फॅनने ज्या पद्धतीने फ्लुएंट इंग्रजी भाषेमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत, त्याबाबत काहींनी तिचे कौतुक केलंय तर काहींनी गंमतीशीर कमेंट्सही केल्या आहेत. संवाद साधण्याची तिची शैली पाहून काहींनी तर तिची तुलना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केलीय.
"मुंबईची डोनाल्ड" नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया
"माझ्याकडे शब्द नाहीत... आज प्रत्येक खेळाडूने त्यांची सर्वोत्तम कामगिरी केलीय. याचे श्रेय दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांना जाते, त्या दोघींनीही सुंदर खेळी खेळली. सर्वांनी खूप चांगले योगदान दिले. इतक्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आपण वर्ल्डकप जिंकलोय. आज त्यांनी दाखवलेला संयम, निष्ठा आणि प्रेम अविश्वसनीय होते. मैदानावरील खेळाडूंपासून ते डीवाय पाटील स्टेडिअममध्ये असणाऱ्या प्रशिक्षक आणि समर्थकांपर्यंत प्रत्येकाने प्रत्येक मॅचमध्ये सुंदर कामगिरी केली", अशी प्रतिक्रिया टीम इंडियाच्या छोट्या फॅनने 'PTI' या वृत्तसंस्थेशी बातचित करताना दिलीय.
टीम इंडियाची छोटी फॅन, ऐका संपूर्ण VIDEO
VIDEO | Mumbai: As the Indian women's team wins their first-ever ICC World Cup title, defeating South Africa by 52 runs in the final, a cute little fan says, “I don't have words to explain... every player who played today gave their best. Credit goes to Deepti Sharma and Shafali… pic.twitter.com/2k1Sui1cY3
— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2025
नेटकरी या मुलीचा व्हिडीओ गंमतीशीर कॅप्शन देऊन शेअर करत आहेत.
"मुंबईची डोनाल्ड तृप्ती"
टीम इंडियाच्या छोट्या फॅनचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या गंमतीशीर कमेंट्सचा पाऊस

Photo Credit: PTI AND X

Photo Credit: PTI AND X
टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
महिला वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या टीमला धुळ चारली. यापूर्वी 47 वर्षांनंतर टीम इंडियाने महिला वर्ल्डकप जिंकलाय. वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा 52 धावांनी पराभव करुन दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर देशभरात फटाक्यांची आतशबाजी करून देशवासीयांनी जल्लोष साजरा केला.
(नक्की वाचा: Jemimah Rodrigues Dance Video: दिसते मी भारी...! जेमिमा रॉड्रिग्सने गुलाबी साडी या मराठी गाण्यावर मैदानात धरला ठेका)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
