जाहिरात

साकी साकी गाण्यावर धमाकेदार नाचली काकी, Video पाहून म्हणाल 'रह ना जाए कोई ख्वाहिश बाकी'

Saki Saki Dance Viral Video : साकी साकी गाण्यावर थिरकल्या काकी, सोशल मीडियावर डान्स होतोय व्हायरल...

साकी साकी गाण्यावर धमाकेदार नाचली काकी, Video पाहून म्हणाल 'रह ना जाए कोई ख्वाहिश बाकी'

Saki Saki Dance Viral Video : सोशल मीडियावर कधी कोणता कॉन्टेंट व्हायरल होईल, याचा नेम नाही. पण यामुळे काही लोकांमधील कलाकौशल्य गुणांना नक्कीच प्रोत्साहन मिळते तर काहींना प्रचंड ट्रोल केले जाते. नेटकऱ्यांना व्हिडीओ आवडला तर कॉन्टेंट क्रिएटर्संना देखील रातोरात प्रसिद्ध मिळते. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. deepali_akash_saras नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या महिलेचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओमध्ये ही महिला 'साकी साकी' गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. तुम्ही हा व्हिडीओ एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा पाहाल. तिच्या प्रत्येक डान्स स्टेप प्रशिक्षण घेतलेल्या डान्सरप्रमाणे दिसत आहेत. चांगल्या ठिकाणाची निवड करण्याऐवजी तिने घरामध्येच डान्स व्हिडीओ शूट केलाय.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या महिलेच्या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

(नक्की वाचा: Shah Rukh Khan : शाहरूख खानवर तोंड लपवण्याची वेळ का आली ?)

shravu_z_makeover नावाच्या युजरने 'जबाबदारीमुळे हरवलेले टॅलेंट' अशी कमेंट केलीय. तर 'खूप छान काकी... कोणी कितीही बोलूदे तुम्ही तुमचे पॅशन सोडू नका. लोक पाय खेचायलाच बसले आहेत', असेही कमेंट एका युजरने केलीय. 

(नक्की वाचा: पत्नीला या कारणामुळे गिफ्ट केलेली पोर्शे कार नापसंत, भडकलेल्या पतीने अशी लावली विल्हेवाट)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Akash Saras Insta

'अंगप्रदर्शन न करता कला सादर करण्यासाठी अंगात कला असावी लागते आणि ती तुमच्यात आहे', अशी कमेंट chandrakant46w या युजरने केलीय. 

'लवकर तुम्ही लाइव्ह शोवर डान्स करणार असेच रील्स करत जा' असे म्हणत balaji_narole नावाच्या युजरने शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिपाली आकाश सरस या एक व्हिडीओ क्रिएटर आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्हाला डान्सचे असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतील. प्रत्येक व्हिडीओ वेगळा आणि तितकाच अप्रतिम आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: