जाहिरात

Funny VIDEO: 'Thank You डॉगेश', अपंग भिकारी कुत्र्याचा हल्ल्यानंतर सुसाट पळाला  

Viral Video: अनेकांनी या भिकाऱ्याच्या कृतीवर टीका केली आहे. लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्या दयेचा गैरफायदा घेण्यासाठी तो अपंगत्वाचे नाटक करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.

Funny VIDEO: 'Thank You डॉगेश', अपंग भिकारी कुत्र्याचा हल्ल्यानंतर सुसाट पळाला  

Viral VIDEO: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये एका भिकाऱ्याचे अपंगत्वाचे नाटक उघड झाले आहे. रस्त्यावर रेंगाळत चालणाऱ्या आणि लोकांची दया मिळवणाऱ्या या भिकाऱ्याची पोलखोल एका अनपेक्षित घटनेमुळे झाली.

व्हिडिओच्या सुरुवातीला हा व्यक्ती रस्त्यावर, लोकांच्या नजरेसमोर, रेंगाळत चालताना दिसतो. त्याची अवस्था पाहून लोकांना त्याची दया यावी आणि त्यांनी मदत करावी, असा त्याचा प्रयत्न असतो. तो आपल्या हातांनी आणि कमरेच्या खालच्या भागाला फरफटत पुढे सरकत आहे, ज्यामुळे तो पाठीच्या किंवा पायाच्या गंभीर समस्येने त्रस्त असल्याचे चित्र उभे राहते.

Funny VIDEO

कुत्र्याच्या हल्ल्यामुळे सत्य आले बाहेर

मात्र, काही वेळातच एक अनपेक्षित घटना घडते, ज्यामुळे त्याचे हे नाटक उघड होते. रस्त्यावर बाजूला असलेल्या एका दुकानाच्या दिशेने जात असताना, एक कुत्रा त्याच्या दिशेने धावतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. कुत्र्याचा हल्ला होताच, आतापर्यंत अपंगत्वाचा आव आणून रेंगाळणारा तो भिकारी झटकन उभा राहतो आणि कुत्र्यापासून वाचण्यासाठी धावतो!

अनेकांनी या भिकाऱ्याच्या कृतीवर टीका केली आहे. लोकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्या दयेचा गैरफायदा घेण्यासाठी तो अपंगत्वाचे नाटक करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतल्याने त्याचे ढोंग उघड झाले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com