Viral Video: कोणाचं नशीब कधी आणि कसे बदलेल, काहीच सांगता येत नाही. अशीच काहीशी घटना एका भारतीय रिक्षाचालकासोबत घडलीय. फ्रान्समधून भारत फिरायला आलेली परदेशी तरुणी आणि भारतीय ऑटोचालक यांची हटके प्रेमकहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. दोघांचंही जग वेगवेगळं आणि पण त्यांचे मन कायमची जुळली. अखेर प्रेमाने देशाची सीमा ओलांडलीच. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कहाणीनुसार, फ्रान्समधील एक तरुणी पर्यटनासाठी भारतात आली होती. यादरम्यान तिची भेट एका स्थानिक रिक्षाचालकाशी झाली. संवादातून सुरू झालेलं नातं हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदललं. भाषा, संस्कृती आणि देश वेगळे होते; पण दोघांच्या एकमेकांबाबतच्या भावना एकसारख्याच होत्या. ही हटके कहाणी लोकांच्या मनाला स्पर्श करतेय कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा नाहीय. या दोघांच्या नात्यातील सच्चेपणा आणि आपुलकी आताच्या जगात फार क्वचितच पाहायला मिळते.
जयपूरमध्ये ओळख झाली आणि प्रेम फुललं (Love Story That Began On Jaipur Streets)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर @venom1s नावाच्या युजरने शेअर केलेल्या मिनिटभराच्या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलंय. व्हिडीओमध्ये या जोडप्याचे काही फोटो दिसतायेत. फोटोतील तरुण जयपूरमध्ये सामान्य रिक्षाचालक होता. फ्रान्समधून आलेली सारा जेव्हा त्याच्या रिक्षामध्ये बसली तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले. सारा युरोपमधून भारत देश फिरायला आली होती आणि त्या तरुणाने जवळपास दोन आठवडे तिला आपल्या ऑटोमधून संपूर्ण जयपूर फिरवलं. यादरम्यान दोघांमध्ये संवाद-विश्वासामुळे मैत्रीचे नाते पक्के नाते निर्माण झालं. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले.
अंतर, व्हिसा आणि कुटुंबीयांचा नकार (Jaipur Auto Driver French Woman Love Story)
सारा युरोपला परतल्यानंतर तिला रिक्षाचालकाची आठवण येऊ लागली. पण दररोज तास-न्-तास चालणाऱ्या संवादामुळे त्यांचं नातं अधिक मजबूत झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण मार्ग सोपा नव्हता. तरुण फक्त इयत्ता दहावीपर्यंत शिकलेला आणि पेशाने रिक्षाचालक असल्याने साराच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्यास विरोध दर्शवला. याच कारणामुळे त्याचा फ्रान्सचा व्हिसा अनेकदा नाकारला गेला. हा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती पण संयम आणि विश्वासाने त्यांची साथ कायम दिली.
(नक्की वाचा: Viral News: लग्नाच्या 10 महिन्यातच बाळ जन्मलं तर जोडप्यावर दंडात्मक कारवाई! गावाच्या विचित्र नियमांमुळे वाद)
A white girl from France came to India to travel. She met an auto driver and both fell in love with each other.
— ︎ ︎venom (@venom1s) January 4, 2026
He was 10th fail, so his visa was rejected many times.
Finally, he reached France and they got married. Now they have two beautiful kids.
Love seeing Indian men win. pic.twitter.com/2wSFyhzIj2
(नक्की वाचा: 15 Kg Silver Slab Viral Video: बटाटा-टोमॅटोप्रमाणे 15 Kg चांदीच्या स्लॅबची होतेय विक्री, रस्त्यावर लावले स्टॉल)
अखेर तरुण फ्रान्समध्ये पोहोचलाच, प्रेम जिंकलं (Viral Love Story India France)अनेक प्रयत्नांनंतर रिक्षाचालक तरुणाला फ्रान्समध्ये पोहोचण्यात यश मिळाले आणि यानंतर दोघांनी लग्न केलं. आज हे जोडपं दिवाळी आणि ख्रिसमस दोन्ही सण एकत्र साजरे करतात. संबंधित तरुणाने व्हिडीओमध्ये असेही नमूद केलंय, की, "लोक म्हणायचे ती तुला सोडून जाईल, पण 13 वर्षांनंतरही ती माझ्यासोबत आहे." या दोघांचं आज एक छोटंसं, आनंदी कुटुंब आहे. या जोडप्याला दोन मुलं आहेत. प्रेम खरं असेल तर त्यासमोर उभी राहणारी आव्हानं कायमच ठेंगणी वाटतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जोडपे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

