जाहिरात

Viral Video: 'मी प्रेग्नेंट आहे...' पोलिसाने अंगावर गाडी घालून फरफटत नेलं, मरीन ड्राइव्हवर हायव्होल्टेज ड्रामा

Viral Video: प्रेग्नेंट महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यातील हायव्होल्टेज ड्रामा कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video: 'मी प्रेग्नेंट आहे...' पोलिसाने अंगावर गाडी घालून फरफटत नेलं, मरीन ड्राइव्हवर हायव्होल्टेज ड्रामा
"Viral Video : पोलीस कर्मचाऱ्याने गर्भवती महिलेला स्कुटीने फरफटत नेले"
Social Media

Viral Video: पोलीस कर्मचारी आणि एका महिलेमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलीस कर्मचाऱ्याने थेट महिलेच्या अंगावर स्कुटी घालून तिला उलट दिशेनं फरफटत नेत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. रिपोर्ट्सनुसार महिला मरीन ड्राइव्ह परिसरात तिच्या पतीसोबत फिरण्यासाठी गेली होती. परतीचा प्रवास करताना त्यांना यू-टर्न घ्यावा लागणार होता, जे दूर होते. यासाठी पती-पत्नी चुकीच्या बाजूने स्कुटीला धक्का देत परतत होते. महिला स्कुटीला धक्का देत होती, तितक्यात एक पोलीस कर्मचारी तेथे पोहोचला आणि त्यांना थांबवलं. चुकीच्या बाजूने गाडी चालवण्यावर पोलिसाने आक्षेप नोंदवला. तपासणी केली असता पूर्वीची अनेक चलन प्रलंबित असल्याचे आढळून आलं. यानंतर पोलिसांनी स्कुटी जप्त करुन पोलीस ठाण्याच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. 

"मी प्रेग्नेंट आहे, असं करू नका..."

येथूनच हायव्होल्टेज ड्राम्याला सुरुवात झाली. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, जप्त केलेली स्कुटी पोलिसांनी सुरू केली त्यावेळेस महिला स्कुटीसमोरच जाऊन उभी राहिली. महिला गाडीसमोर उभी असतानाही पोलीस कर्मचाऱ्यानं स्कुटी सुरू करून तिला उलट दिशेने फरफटत नेले. यावेळेस महिला सतत ओरडत होती की मी प्रेग्नेंट आहे, असे करू नका... गाडी माझ्या अंगावर चढवू नका. तरीही तिचे काहीही न ऐकता, न थांबता पोलीस कर्मचारी स्कुटी चालवत राहिला.

गाडी थांबवल्यानंतर महिला म्हणाली की, मी तरी गाडी चालवते किंवा तुम्ही मला गाडीवर बसू द्या, मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये येणार; पण पोलीस कर्मचारी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतंय. 

(नक्की वाचा: Viral Video: 'घुंघट की आड़ से...' गाण्यावर मुलांच्या टोळीनं केला असा धमाल डान्स, एक-एक अदा पाहून व्हाल फिदा)

नेमकी कुठे घडलीय ही घटना? 

पाटणा शहरातील मरीन ड्राइव्ह परिसरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. इंडियन युथ काँग्रेसने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, पाटणा मरीन ड्राइव्हवरील हा व्हिडीओ आहे. डबल इंजिन सरकारचे पोलीस गर्भवती महिलेला रस्त्यावर गाडीने चिरडतेय. 

NOTE: NDTV या व्हिडीओची पुष्टी करत नाही

Listen to the latest songs, only on JioSaavn.com