
पती आपल्यावर पूर्वीसारखा प्रेम करत नाही, दुर्लक्ष करतो यामुळे निराश झालेल्या एका महिलेने पुन्हा आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तिने यासाठी बंबल या डेटींग अॅपचा आधार घेतला आणि तिला एक तरुण बंबलवरच सापडला. या महिलेचे वय 42 वर्ष असून तिची बंबलवर ओळख झालेल्या तरुणाचे वय आहे 28 वर्ष. ऑनलाईन डेटींग अॅपवरून सुरू झालेल्या या प्रवासाचा अंत भयानक होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मानसोपचारतज्ज्ञ किशन सिंह यांनी इन्स्टाग्रामवर एक सत्य घटना शेअर केली आहे. त्यांच्याकडे मानसिक उपचारासाठी आलेल्या महिलेच्या आयुष्यात काय घडले हे त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे. हे सगळं वाचल्यानंतर चित्रपटात घडणाऱ्या अकल्पनिय घटना वास्तविक आयुष्यातही होतात हे पटू लागतं.
नक्की वाचा: जोडप्याचा गरब्यातील Kissing VIDEO व्हायरल, नागरिकांच्या संतापानंतर तातडीने देश सोडला
प्रियकराला इंटर्न म्हणून घरी आणले
किशन सिंह यांनी ही पोस्ट करत असताना आपल्या रुग्णाची ओळख गुप्त राहावी यासाठी नावे बदलली आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पती परदेशात असताना, सुनिताने करणला घरी बोलावले होते. सुनीताला मीरा नावाची मुलगी आहे. या मुलीला आपल्या नव्या नात्याबद्दल कळू नये यासाठी सुनिताने मीराला खोटं सांगितले. करण हा आपल्या कंपनीत काम करणारा इंटर्न असल्याचे तिने सांगितले होते. काही दिवसांनी सुनीता आणि करण यांच्यात काहीतरी बिनसले आणि तिने करणसोबतचं नातं संपुष्टात आणण्याचे ठरवले. सुनीताने करणसोबत ब्रेकअप केले, तेव्हा तो जाम भडकला होता आणि त्याने सुनीताला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. त्याने ब्रेकअपनंतर सुनीताची मुलगी म्हणजेच मीराशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि काही दिवसांतच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मीराच्या आईला म्हणजेच सुनीताला याबद्दल काहीच माहिती नव्हते.
आईवरील रागामुळे मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले
एकेदिवशी सुनीताची मुलगी तिच्याकडे रडत आली आणि तिने सांगितले की तिचं पोट भयानक दुकतंय. वैद्यकीय तपासणीत ती 1 महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. हे कोणी केलं असं विचारलं असता सुनीताच्या मुलीने करणचे नाव सांगितले. हे ऐकल्यानंतर सुनीताला जबर धक्का बसला. हा सुनीतावर दुहेरी आघात होता. ज्या तरुणावर आपण काही महिन्यांपूर्वी प्रेम केले होते त्याने आपल्यासोबत आणि आपल्या मुलीसोबत इतके वाईट करावे ? या विचाराने सुनीता हादरली होती.
नक्की वाचा: ऑफिसमध्ये तुम्हालाही चापलूस सहकाऱ्यांमुळे त्रास होतोय? प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला ऐका
आता काय करायचे? आई सापडलीय संकटात
सुनीताला आता प्रश्नांचे मोहोळ सतावतंय. पतीला सत्य सांगून घटस्फोटाची तयारी करावी का? पोलिसांकडे जाऊन करणला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यावी का? का मुलीच्या भविष्यासाठी गप्प बसावे? या प्रश्नांनी सुनीताची झोप उडालीय. ऑनलाईन डेटींग अॅपमुळे एखाद्यावर काय भयानक परिस्थिती ओढावू शकते हे या घटनेवरून दिसून आले आहे. असा प्रकार कोणासोबतही घडू नये, या उद्देशाने, लोकांना शहाणे करण्ययाच्या उद्देशाने किशन सिंह यांनी पोस्ट शेअर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world