जाहिरात
This Article is From Sep 25, 2024

भावी पतीकडून महिलेला आहेत या अपेक्षा, 3BHK फ्लॅट-30 लाख रुपये पगार आणि बरंच काही

Girl Marriage Wishlist Goes Viral: सोशल मीडियावर एका महिलेशी संबंधित पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या भावी पतीमध्ये कोणते गुण असावेत? याची माहिती दिली आहे.  

भावी पतीकडून महिलेला आहेत या अपेक्षा, 3BHK फ्लॅट-30 लाख रुपये पगार आणि बरंच काही

Girl Marriage Wishlist Goes Viral: मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला त्यांच्या जोडीदारामध्ये ठराविक गुण नक्कीच असावेत, अशी इच्छा असते. आजच्या डिजिटल युगामध्ये डेटिंगपासून ते लग्न जुळवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स आहेत. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करून तरुण-तरुणी स्वतःसाठी त्यांच्या अटीशर्थींनुसार जोडीदाराची निवड करू शकतात. पण ही प्रक्रिया दिसतेय तितके सोपी नसते. कारण भावी जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत, याबाबत प्रत्येकाची यादी भलीमोठी असते. नुकतेच सोशल मीडियावर एका 39 वर्षीय महिलेची भावी जोडीदारासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे. भावी पतीमध्ये कोणकोणते गुण असावते? याबाबतची माहिती तिने पोस्टमध्ये लिहिली आहे.  महिलेच्या भावी पतीकडून असलेल्या अपेक्षा पाहून युजर्स आश्चर्य व्यक्त करताहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भावी पतीमध्ये असावेत हे गुण

39 वर्षीय महिलेची तिच्या भावी पतीकडून असलेल्या अपेक्षांची यादी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही महिला घटस्फोटित असून एका खासगी शाळेमध्ये शिक्षिका आहे. स्वयंपाक कसा करायचा हे तिला माहीत नाही, पण तिला पाइव्हस्टार हॉटेलमध्ये जेवायला आवडते. तिचे वार्षिक उत्पन्न 1.32 लाख रुपये आहे, म्हणजे महिन्याला जवळपास 11 हजार रुपये पगार आहे.  तिला Louis Vuitton ब्रँडचे कपडे परिधान करणं आवडते. लग्नानंतरही तिचे आईवडील तिच्याचसोबत राहतील, अशीही अट आहे. कारण पालक तिच्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत. एकूणच भावी पतीकडून या महिलेला खूप अपेक्षा आहेत. 

2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO

(नक्की वाचा: 2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO)

महिलेच्या पतीकडून आहेत या अपेक्षा

भावी पतीचे वय 34-39 वर्षांदरम्यान असावे.
पार्टनर निरोगी असावा आणि त्याचे कधीही लग्न झालेले नसावे.
भावी पतीने अमेरिकेतून MBA किंवा MA पदवी संपादित केलेली असावी. 
भारत, अमेरिका किंवा युरोपमध्ये जॉब करणारा असावा. 
वार्षिक पगार कमीत कमी 30 लाख रुपये असावा.
NRI असेल तर वार्षिक कमाई 96 हजार युएस डॉलर इतकी असावी. 
3BHKचे फ्लॅट असावा आणि त्याचे आईवडील त्याच्यासोबत राहणारे नसावेत. 

Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी जणू

(नक्की वाचा: Aishwarya Rai Video: ऐश्वर्या राय वयाच्या 80व्या वर्षी दिसेल अशी! चेहऱ्यावर सुरकुत्या तरीही म्हणाल सुंदरी जणू)

युजर्संनी उडवली खिल्ली

भावी पार्टनरकडून असलेल्या महिलेच्या अपेक्षा पाहिल्यानंतर युजर्सकडून सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहे.  10 सप्टेंबर रोजी एका 'X' युजरने मेट्रिमोनियल साइटवरुन या महिलेच्या बायोडेटाचे स्क्रीनशॉट काढून आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहे. @ShoneeKapoor या  अकाऊंटवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, महिलेमधील गुण तसेच पगार पाहा आणि तिला अपेक्षित असलेल्या जोडीदारातील गुण आणि पगार पाहा'. संबंधित पोस्ट 1.6 दशलक्ष वेळा पाहिली गेलीय तर 12 हजारहून अधिक लोकांनी पोस्ट लाइक केलीय. 'महिलेच्या अपेक्षा जरा जास्त आहेत', अशी कमेंट एका युजरने केली आहे. दुसऱ्या युजरने म्हटलंय की, 'कदाचित हे तिचे स्वप्न असावे'. आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, 'लग्न तर दूरच, कोणी डेटही करणार नाही'.