
Heart Attack Viral Video: गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जाणवत असून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अगदी चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना बसल्या जागीच हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुणाला हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना हार्ट अटॅक आल्याचे दिसत असून या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. सचिन कुमार असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या राजसमंद येथे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बील भरताना तरुणाला हार्ट अटॅक आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही घटना हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सचिन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून जो राजसमंद नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी होता.
‼️💉💉Silent genocide continues in India!!
— Rohit Mishra (@RohitMishra2024) March 5, 2025
एक युवक खाना खाने के बाद होटल का बिल चुकाने काउन्टर पर जाता है और फिर बिल देखता है तभी अचानक हार्ट अटैक आकर 27 साल के युवक की मौत हो जाती है😢 आखिर क्या कारण हैं कि लोगों की अचानक मौत हो रही है?गंभीर सवाल हैं 🙏https://t.co/XlnfjhTtHV pic.twitter.com/8VGmk87FnW
हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर सचिन कुमार हा बिल देण्याासाठी काऊंटरजवळ पोहोचला. सचिन कुमार हॉटेलच्या रिसेप्शनवर बिल भरण्यासाठी उभा असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जमिनीवर पडला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने सर्वत्र खळबल उडाली आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की तो तरुण रिसेप्शनवर पोहोचला आणि त्याने बडीशेपही खाल्ली मात्र अचानक त्याला हार्ट अटॅकला आणि तो जाग्यावर कोसळला. जेवणानंतर तो रिसेप्शनजवळ जाऊपर्यंत सगळं ठीक होतं. मात्र अचानक हा त्याला हार्ट अटॅक आल्याचे त्या व्हिडिओमध्य दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अशा प्रकारच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : मुस्लीम महिलांना पोटगीचा अधिकार मिळताच शाहबानो खटला आणि राजीव गांधींची पुन्हा चर्चा का? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world