जाहिरात

धाडस की अतिआत्मविश्वास? एकाच वेळेस हातात 6 साप पकडणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या युजर्सचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्या पद्धतीने न घाबरता तरुणाने एकाच वेळेस सहा साप पकडले आहेत, ते दृश्य पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

धाडस की अतिआत्मविश्वास? एकाच वेळेस हातात 6 साप पकडणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर भयानक सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही साप दिसायला इतके भयानक असतात की केवळ व्हिडीओ पाहूनही लोकांची घाबरगुंडी उडते. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणाने आपल्या हातामध्ये एकाच वेळेस सहा साप पकडल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  

(नक्की वाचा : 'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का)

दरम्यान मानवी संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून अध्यात्मिकदृष्ट्या या प्राण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. पण विषामुळे माणसांमध्ये सापाची दहशतही तितकीच आहे. जंगलामध्ये आढळणारा हा प्राणी काही जण अवैधरित्या पाळू देखील लागले आहेत.  

पाहा VIDEO :

दुसरीकडे सोशल मीडियावर या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचे दिसत आहे. काहींनी या तरुणाच्या धाडसाचे कौतुक केले आहे, तर काहींना अतिआत्मविश्वास असल्याचे म्हणत टीका देखील केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, "हे अतिशय धोकादायक कृत्य आहे, देवा," दुसऱ्याने लिहिलेय की, "ओएमजी, कृपया असे पुन्हा करू नको."

(नक्की वाचा : VIRAL VIDEO: पैसे मागितले म्हणून जेसीबीचा चालकाची सटकली; टोल नाक्याची केली तोडफोड)

हा व्हिडीओ पाहू देखील शकत नाहीय कारण दृश्य अतिशय भयानक आहे, असे एका युजरने म्हटलेय. दरम्यान तुमचे या व्हिडीओबाबत काय म्हणणे आहे, हे आम्हाला नक्की सांगा.

(नक्की वाचा : VIRAL VIDEO: अटल सेतूवर मनोरुग्णाचा नग्नावस्थेत धिंगाणा, टोल कर्मचारी मेटाकुटीस)

Solapur Fish | मच्छिमारांसाठी Good News, उजनीकडे येणाऱ्या नदीत माशांची संख्या वाढली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'ती' मध्यरात्री प्रत्येक घराची वाजवत होती बेल, रहस्यमयी महिलेचं सत्य समजल्यावर सर्वांनाच धक्का
धाडस की अतिआत्मविश्वास? एकाच वेळेस हातात 6 साप पकडणाऱ्या तरुणाचा VIDEO VIRAL
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral on instagram 
Next Article
हिच्याकडेच नागमणी असणार! झोपलेल्या महिलेच्या केसात फिरणारा साप पाहून लोकं हादरले