जाहिरात

Bangladesh Bus Accident: बांगलादेशात बस नदी कोसळली, 23 प्रवाशांना जलसमधी

Bangladesh Bus Accident: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनलवर बुधवारी संध्याकाळी एक बस फेरीवर चढताना नियंत्रण सुटल्याने पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.

Bangladesh Bus Accident: बांगलादेशात बस नदी कोसळली, 23 प्रवाशांना जलसमधी
  • बांग्लादेश में पद्मा नदी में एक बस गिरने से 20 से ज्यादा यात्रियों की मौत हो गई और कई लोग लापता हैं
  • 40 यात्रियों से भरी बस ईद की छुट्टियां मनाकर ढाका वापस लौट रही थी तभी हादसा हो गया
  • सेना, पुलिस, फायर ब्रिगेड और तटरक्षक बल मिलकर राहत कार्य कर रहे हैं और रेस्क्यू ऑपरेशन जारी है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ढाका:

ईदचा आनंद साजरा करून आपल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांसाठी बुधवारची संध्याकाळ घातकी ठरली. प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळल्याने किमान 23 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. ईदच्या सुट्ट्या संपवून ढाका येथे परतणाऱ्या प्रवाशांवर काळाने झडप घातली. राजबारी जिल्ह्यातील दौलतडिया टर्मिनल येथे फेरीवर (नौकेवर) चढण्याचा प्रयत्न करत असताना एक प्रवासी बस थेट खोल नदीत कोसळली.

अपघात कसा झाला?

बुधवारी संध्याकाळी साधारण 5.15 वाजता ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, 40 प्रवाशांनी भरलेली ही बस फेरीकडे जात असताना एका छोट्या बोटीला धडकली. या धडकेमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पद्मा नदीच्या पात्रात कोसळली. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते, जे ईदची सुट्टी साजरी करून राजधानी ढाकाकडे जात होते.
 

PTI फोटो.

PTI फोटो.

रेस्क्यू ऑपरेशन आणि आव्हाने

अपघातानंतर घटनास्थळी मोठा हाहाकार माजला. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. लष्कर, पोलीस, अग्निशमन दल आणि तटरक्षक दलाच्या पथकांनी मिळून बचावकार्य राबवले. सुमारे 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बसला नदीबाहेर काढण्यात आले. आतापर्यंत 23 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता प्रवाशांचा शोध अद्याप सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

PTI फोटो.

PTI फोटो.

प्रशासनाचा इशारा

नदी ओलांडताना फेरीवर चढताना होणारी घाई आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

ईदच्या सणानंतर आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबांवर हा दुखाचा डोंगर कोसळल्याने संपूर्ण बांगलादेशात शोककळा पसरली आहे. अनेक कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या शोधात नदीकाठी थांबून आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com