जाहिरात
This Article is From Apr 05, 2024

बोत्सवाना जर्मनीला 20 हजार हत्ती पाठवणार, कारण काय?

बोत्सवाना जर्मनीला 20 हजार हत्ती पाठवणार, कारण काय?
बोत्सवाना:

बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मासिसी यांनी जर्मनीला २० हजार हत्ती पाठवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी "जर्मनीतील लोकांनीही हत्तींसोबत एकत्र राहण्याचा अनुभव घ्यावा असे म्हटले आहे. या हत्तींचा स्वीकार जर्मनीने करावा असेही त्यांनी स्पष्ट केले. ही भूमीका घेण्यामागे जर्मनीच्या पर्यावरणमंत्र्याचे वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. 

जर्मनीचे पर्यावरण मंत्री काय म्हणाले?

  • बोत्सवानामध्ये हत्तींची शिकार आणि तस्करीवर निर्बंध घालावेत अशी मागणी जर्मनीचे पर्यावरण मंत्री यांनी केली होती.
  • त्यांच्या या विधानाचे बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्ष यांनी निषेध करत जर्मनीला इशारा दिला आहे.
  • ते म्हणाले की, संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे, बोत्सवानामध्ये हत्तींची संख्या सतत वाढत आहे. 
  • हत्ती देशातील पिक नष्ट करत आहेत. 
  • लोकांना, विशेषत: लहान मुलांना पायदळी चिरडत आहेत. 
  • मालमत्तेचेही नुकसान करत आहेत. 
  • यामुळे आफ्रिकन नागरिक उपाशी आहेत.

शिकार करा, मात्र पैसे द्या

  • जगातील हत्ती लोकसंख्येपैकी एक तृतीयांश बोत्सवानामध्ये राहतात. 
  • बोत्सवानामध्ये त्यांची संख्या १ लाख ३० हजारांहून अधिक आहे.
  • भारतातील हत्तींच्या लोकसंख्येपेक्षा हे प्रमाण 4 पट जास्त आहे. 
  • पाश्चात्य देशांतील लोक विशेषतः जर्मनी बोत्सवानासारख्या अनेक आफ्रिकन देशांमध्ये हत्तींची शिकार करण्यासाठी जातात. 
  • यासाठी येथील सरकार शिकारीकडून हजारो डॉलर्स शुल्क आकारते.
  • हे पैसे हत्तींच्या संरक्षणासाठी आणि स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जातात. 
  • शिकार केल्यानंतर, ट्रॉफी म्हणून हत्तीचे डोके आणि कातडे त्यांच्या देशात परत घेऊन जातात. 
  • त्यांना शिकार करंडक असे म्हटले जाते. 
  • अनेक प्राणी हक्क संघटनांचा या व्यवस्थेला विरोध आहे त्यांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी ब्रिटनलाही 10 हजार हत्ती पाठवण्याचा इशारा

  • ब्रिटनमध्ये 2019 च्या निवडणुकीदरम्यान अध्यक्ष सुनक यांच्या पक्षाने हत्तींच्या शिकारीवर बंदी घालण्याचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्याचा भाग बनवला होता.
  • या वर्षी मार्चमध्ये ब्रिटीशांनीही हंटिंग ट्रॉफीवर बंदी घालण्यासंबंधी विधेयक मंजूर केले होते.
  • यावर बोत्सवानाचे वन्यजीव मंत्री मिथिमखुलू यांनी ब्रिटनला इशारा दिला होता. 
  • ते म्हणाले होते की, "आम्ही लंडनमधील हाईड पार्कमध्ये 10 हजार हत्ती पाठवतो. 
  • यामुळे तेथील लोकांना हत्तींसोबत राहणे कसे असते हे देखील कळेल. 
  • बोत्सवानाच्या काही भागात माणसांपेक्षा हत्तींची संख्या जास्त आहे. 
  • पिकांसोबतच आत येताना ते लहान मुलांनाही चिरडतात.

हत्तींच्या शिकारीसाठी कोटा

  • बोत्सवानामध्ये २०१४ मध्ये हंटिंग ट्रॉफीवर बंदी घालण्यात आली होती. 
  • यानंतर हत्तींची संख्या झपाट्याने वाढू लागली.
  • आता बोत्सवानामध्ये हत्तींच्या शिकारीसाठी दरवर्षी एक कोटा निश्चित केला जातो.
  • बोत्सवानाने काही वर्षांपूर्वी देशातील हत्तींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंगोला या देशाला 8 हजार हत्ती दिले होते. 
  • याशिवाय त्यांनी मोझाम्बिकला शेकडो हत्ती दिले आहेत. 
  • ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि बेल्जियम या देशांनी हत्तींच्या शिकार आणि व्यापारावर बंदी घातली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com