जाहिरात

Airplane Crashed : कॅनडा विमानतळावर मोठा अपघात, लँण्डिंगदरम्यान विमान क्रॅश

Canada Plane Crash: डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान मिनियापोलिसहून टोरंटोला येत होते. लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले.

Airplane Crashed : कॅनडा विमानतळावर मोठा अपघात, लँण्डिंगदरम्यान विमान क्रॅश

कॅनडातील टोरंटो विमानतळावर एक मोठा विमान अपघात झाला आहे. डेल्टा एअरलाइन्सचे विमान लँडिंग करताना क्रॅश झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बर्फाळ जमिनीमुळे विमान उलटले. या विमानात 80 प्रवासी होते. ज्यामध्ये 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. 

डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान मिनियापोलिसहून टोरंटोला येत होते. लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले. या अपघातानंतर आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले. या अपघातात 18 जण जखमी झाल्याची माहिती आहे. 

अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये विमान बर्फाळ जमिनीवर उतरताना दिसत आहे. काही वेळातच त्यातून काळा धूर निघू लागला आणि अचानक आग लागली. यावेळी सर्वत्र काळा धूर पसरला. अग्निशमन दलाचे जवान सज्च असल्याने आग तत्काळ नियंत्रणात आणण्यात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: