- डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत लवकरच मोठ्या व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याचा विश्वास व्यक्त केला
- ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत भारतावर अमेरिकेचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे
- भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर जास्त आयात शुल्क लादल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत
US India Trade :अमेरिका आणि भारत लवकरच एका मोठ्या व्यापार करारावर स्वाक्षरी करतील, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले 'चांगले मित्र' असल्याचे सांगत ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले. मात्र, यासोबतच त्यांनी भारतावर अमेरिकेचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोपही केला आहे. भारत अनेक वर्षांपासून अमेरिकेचा फायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण आता तसं होणार नाही. परिस्थिती बदलली आहे असं ही ते म्हणाले.
भारत या आधी अमेरिकेच्या उत्पादनांवर प्रचंड आयात शुल्क (टॅरिफ) लादत होता, परंतु परिस्थिती बदलली आहे. आता अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प बोलत होते. ते पुढे म्हणाले की "यासाठी मी भारताला दोष देणार नाही, तर आमच्या आधीच्या राज्यकर्त्यांना देईन. भारताने अनेक वर्षे अमेरिकेचा फायदा घेतला. त्यांनी आमच्या मालावर प्रचंड टॅरिफ लावले. बदल्यात काहीच दिले नाही असं ही ट्रम्प यावेळी म्हणाले.
पण आता चित्र उलटे आहे. आम्ही भारताकडून मोठ्या प्रमाणात पैसा वसूल करत आहोत. आमचे संबंध उत्तम असल्याने आम्ही लवकरच एका करारावर पोहोचू असं ही ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेने 60 देशांमधून येणाऱ्या मालावर 10 ते 12.5 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव आणला आहे. 'सक्तीची मजुरी' (फोर्स्ड लेबर) वापरून तयार केलेल्या उत्पादनांवर निर्बंध घालण्यात भारत, चीन, इस्रायल आणि जपानसह 54 देश अपयशी ठरल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. ट्रेड ऍक्ट 1974 च्या कलम 301 अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. यामध्ये युरोपीय संघ, पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यावरही विशेष निशाणा साधण्यात आला आहे.
#WATCH | President Donald Trump says, "For years, India took advantage of the United States... They charged us tremendous tariffs and paid nothing... Now it is the exact reverse and we are making a lot of money with India. But we will get to a deal because I like your Prime… pic.twitter.com/IR2x2MqUV5
— ANI (@ANI) June 4, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world