जाहिरात

iPhone 17: बाबो! पाकिस्तानात आयफोन 17 ची किंमत ऐकून म्हणाल येवढ्या पैशात तर...

पाकिस्तानची सध्याच्या आर्थिक स्थिती खूप वाईट आहे.

iPhone 17: बाबो! पाकिस्तानात आयफोन 17 ची किंमत ऐकून म्हणाल येवढ्या पैशात तर...

ॲप्पलच्या नवीन iPhone 17 सीरीजने जगभरातील स्मार्टफोन प्रेमींना आकर्षित केले आहे. भारतात या फोनसाठी मोठी क्रेझ दिसत असताना पहायला मिळत आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी भारतात अनेक मोबाईल स्टोअर बाहेर गर्दी दिसून येत आहे. भारता ज्या प्रमाणे  iPhone 17 साठी झुंबड उडत आहे तसेच आकर्षण आपल्या  शेजारील पाकिस्तानमध्येही आकर्षण आहे. पण तिथल्या या फोनच्या किंमती ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. पाकिस्तानी चलनाचे मूल्य कमी असल्यामुळे आयफोन 17 ची किंमत भारतातल्या किमतींपेक्षा खूप जास्त आहे. ज्यामुळे तिथल्या ग्राहकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानमध्ये iPhone 17, iPhone Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max ची किंमत पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 

नक्की वाचा - iPhone 17 : अरे, आवरा याला! iphone 17 ला नवरीप्रमाणे सजवून गृहप्रवेश, नंतर घटस्फोट; व्हिडिओ व्हायरल

किंमतीतील मोठी तफावत
ॲप्पल पाकिस्तानच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये iPhone 17 (256 GB) ची किंमत 325,000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 1,02,014 भारतीय रुपये) आहे. तर भारतात याच व्हेरिएंटची किंमत 82,900 रुपये आहे. या दोन्ही देशांतील किमतींमध्ये जवळपास 19,000 रुपयांचा फरक आहे. iPhone 17 Pro च्या किमतींमध्येही अशीच मोठी तफावत दिसते. पाकिस्तानमध्ये iPhone 17 Pro (256 GB) ची किंमत 440,500 पाकिस्तानी रुपये (सुमारे 1,38,268 भारतीय रुपये) आहे. तर भारतात ती 1,34,900 रुपये आहे.

इतर मॉडेल्सच्या किमती
iPhone Air (256 GB) ची किंमत पाकिस्तानमध्ये 398,500 पाकिस्तानी रुपये (सुमारे 1,25,085 भारतीय रुपये) आहे. भारतात ती 1,19,900 रुपये आहे. iPhone 17 Pro Max (256 GB) ची किंमत पाकिस्तानमध्ये 473,000 पाकिस्तानी रुपये (सुमारे 1,48,470 भारतीय रुपये) असून, भारतात ती 1,49,900 रुपये आहे. ही किमतीतील तफावत पाकिस्तानी रुपयाच्या कमकुवत स्थितीचे स्पष्टीकरण देते.

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

पाकिस्तानी हालत वाईट 
पाकिस्तानची सध्याच्या आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. त्यात हा फोन मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची किंमत ऐकून तो घ्यायचा की नुसता पाहायचा अशी स्थिती पाकिस्तानी लोकांची झाली आहे. तर दुसरीकडे  नुकताच iphone 17 ची सीरिज भारतातही दाखल झाली आहे. iphone 17 च्या खरेदीसाठी मोठी रांग लागली होती. दिल्ली आणि मुंबईत iphone 17 ची क्रेझ पाहता अनेकजण हैराण झाले. यंदाचा iphone 17 मॅक्स प्रो हा त्याच्या नारंगी रंगामुळे अधिक चर्चेत आहे. लोकांमध्ये आयफोन खरेदीसाठी अक्षरश: स्पर्धा लागली आहे. देशातील 70% लोकसंख्या दरवर्षी EMI वर आयफोन खरेदी करते. 

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com