
मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 41 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली, त्यानंतर बसने पेट घेतला. यात 41 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस कॅनकुनहून तबास्कोला जात होती. अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र बस अपघातानंतर पूर्णपणे जळून खाक झाली. शनिवारी सकाळी एस्कार्सेगा शहराजवळ हा अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी प्रवाशांचे प्राण धोक्याबाहेर आहेत.
(नक्की वाचा- Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयरचा म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?)
A traffic accident involving a bus in southern Mexico killed 41 people
— DD News (@DDNewslive) February 9, 2025
The bus, which was carrying 48 people, collided with a truck, resulting in the deaths of 38 passengers and two drivers.#Mexico pic.twitter.com/cYBmV0aZmy
मिळालेल्या माहितीनुसार, 48 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची आणि ट्कची धडक झाली. धडकेनंतर बसने क्षणात पेट घेतला. बस संपूर्ण जळाली. अपघाताची माहिती देताना ताबास्कोच्या कोमलकाल्कोचे महापौर ओव्हिडिओ पेराल्टा यांनी म्हणाले, 'आम्ही आवश्यक मदत पुरवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं आहे. आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Delhi Election Result : 'त्यांचे शॉर्टसर्किट केले....' दिल्लीतील विजयानंतर PM मोदींना दिली 'ही' गॅरंटी )
बस ऑपरेटर टूर्स अकोस्टा यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी गाडीत सुमारे 48 प्रवासी होते. कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. बस वेग मर्यादेत धावत होती आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी ते अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world