
Operation Sindoor : भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या ऑपरेशनच्या अंतर्गत पाकिस्तामच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर भारतीय वायूसेनेनं अचूक हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी आणि त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झालाय. भारताच्या या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. दोन मुस्लीम देशांनी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेत गरळ ओकली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कुणी ओकली गरळ?
पाकिस्तानचा अलिकडच्या काळातील कट्टर मित्र बनलेल्या तुर्कियेनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिलाय. तुर्कियेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत एक पत्रकच प्रसिद्ध केलंय. 'पाकिस्तान आणि भारतामधील घटनाक्रमावर आमचं काळजीयुक्त लक्ष आहे. भारताकडून काल रात्री (6 मे) करण्यात आलेला हल्ल्यामुळे एका व्यापक युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही या प्रकारच्या प्रक्षोभक पावलांवर तसंच नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी केलेल्या कृत्याची निंदा करतो,' असं या युरोपीयन देशानं स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : Operation Sindoor : आजवरच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा 'ऑपरेशन सिंदूर' चं वेगळेपण काय? संपूर्ण माहिती वाचून वाटेल अभिमान! )
तुर्किये प्रमाणेच अझरबैजाननंही पाकिस्तानची बाजू घेतली आहे. अझरबैजानच्या परराष्ट्र धोरण विभागानं एक पत्रक प्रसिद्ध केलंय. त्यामध्ये त्यांनी म्हंटलंय की, 'आम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानर झालेल्या सैनिकी हल्ल्याची निंदा करतो. या हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले तसंच जखमी झाले. निर्दोष पीडितांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. या प्रकरणात सर्व पक्षांनी संयम बाळगावा तसंच मुत्सदी मार्गानं या संघर्षावर तोडगा काढावा, असं आवाहन आम्ही करत आहोत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर हे अभियान राबवले. 6 मेच्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती.
भारताने राबवलेल्या या मोहिमेममध्ये ज्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला, त्यातील 4 ठिकाणे ही पाकिस्तानातील आहेत. उरलेली 5 ठिकाणे ही पाकव्याप्त कश्मीरमधील आहेत. ही ठिकाणं पाकिस्तानी सीमेपासून 30 ते 100 किलोमीटर आतमध्ये आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world