
Shikhar Dhawan Vs Shahid Afridi: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहेत. पाकिस्तान सरकार हे पुरावे नाकारतंय. पाकिस्तान सरकारच्या खोटारडेपणाला त्यांचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं ( Shahid Afridi) साथ दिली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर आफ्रिदीनं भारतीय लष्करावरच आरोप केले होते. आफ्रिदीच्या या असंबद्ध बडबडीला टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवननं (Shikhar Dhawan) उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला धवन?
शिखर धवननं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली असून त्यामध्ये त्यानं आफ्रिदीला टॅग करत सुनावलं आहे. 'कारगिलमध्ये हरला होता. आधीपासून इतके घसरलेले आहात आणखी किती तळ गाठणार? बाष्कळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा देशाच्या विकासामध्ये डोकं खर्च करा. आम्हाला भारतीय सैन्याचा अतिशय अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!' शिखर धवनची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
Kargil mein bhi haraya tha, already itna gire hue ho aur kitna giroge, bewajah comments pass karne se acha hai apne desh ki taraqqi mai dimag lagao @SAfridiOfficial. Humein hamari Indian Army par bohot garv hai. Bharat Mata Ki Jai! Jai Hind!https://t.co/5PVA34CNSe
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 28, 2025
आफ्रिदी काय म्हणाला होता?
शाहिद आफ्रिदीनं यापूर्वी भारतीय सैन्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानं पहलगाम हल्ला रोखण्यात भारतीय सैन्य अपयशी ठरलं असं सांगताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. आफ्रदी एका टीव्ही शो मध्ये म्हणाला होता की , ' तुमचं 8 लाख सैन्य काश्मीरमध्ये आहे, आणि तिथं हे झालं. याचा अर्थ तुम्ही नालायक आहात. निकम्मे आहात. तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही.'
( नक्की वाचा : बंदुकीतून धाडधाड सुटणाऱ्या गोळ्या, चेहऱ्यावर मृत्यूची भीती! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा भयंकर Video )
या हल्ल्यानंतर एका तासांनी तिथला मीडिया बॉलिवूड बनला हे पाहून धक्का बसला. खुदासाठी प्रत्येक गोष्टीला बॉलिवूड करु नका. ही लोकं स्वत:ला शिकलेले समजतात आणि या पद्धतीनं विचार करतात.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world