जाहिरात

South Korea Plane Crash : केवळ 2 प्रवासी बचावले, दक्षिण कोरिया अपघातात 179 प्रवाशांचा मृत्यू

2024 वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

South Korea Plane Crash : केवळ 2 प्रवासी बचावले, दक्षिण कोरिया अपघातात 179 प्रवाशांचा मृत्यू

2024 वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी सकाळी मोठा विमान अपघात झाला. क्रू मेंबरसह 181 प्रवाशांना घेऊन बँकॉकवरुन परतत असताना विमान लँड करीत असताना रनवेवर विमान भिंतीला धडकलं. या अपघातात केवळ दोन प्रवासी बचावले असून सर्व 179 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Kazakhstan Plane Crash: कजाकिस्तानमध्ये लँडिंगदरम्यान कोसळलं विमान, क्रू मेंबरसह 72 जण करत होते प्रवास

नक्की वाचा - Kazakhstan Plane Crash: कजाकिस्तानमध्ये लँडिंगदरम्यान कोसळलं विमान, क्रू मेंबरसह 72 जण करत होते प्रवास

न्यूज एजन्सी एएफपीच्या बातमीनुसार, दोन प्रवाशांना रेस्क्यू करण्यात यश आलं आहे. या अपघाताचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. विमानाचं लँडिग झाल्यानंतर रनवेवर विमान पुढे जात राहतं आणि समोरील भिंतीला धडक बसले. यानंतर विमानाचा मोठा स्फोट होतो आणि आगीच्या ज्वाळा उठतात. गेल्या पाच दिवसात हा दुसरा विमान अपघात आहे. 25 डिसेंबरला कझाकिस्तानमधील अजरबैजान एअरलाइन्सचं विमान क्रॅश झालं होतं. 

रविवारी बँकॉकहून येणारं विमान दक्षिण कोरियाच्या जिओला प्रांतातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना अपघातग्रस्त झाले. विमान धावपट्टीवरून घसरले आणि समोरील गेटवर धडकले, त्यामुळे विमानाने पेट घेतला. या विमानात एकूण 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com