
अमेरिकेत दोन खासदारांना घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एका खासदाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील मिनेसोटा येथील दोन डेमोक्रॅटिक खासदारांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिल्या घटनेत, डेमोक्रॅटिक स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह मेलिसा हॉल्टमन यांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या घटनेत, डेमोक्रॅटिक स्टेट सीनेटर जॉन हॉफमन आणि त्यांच्या पत्नी येवेट यांना अनेक गोळ्या लागल्या आहेत. दोघेही जखमी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टरांना ते दोघे वाचतील अशी आशा आहे.
मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी या घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, हा हल्ला राजकीय कारणांमुळे झाल्याचे दिसत आहे.
( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सर्वात पहिला Viral Video, कुणी आणि कुठे बनवला? )
या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही प्रतिक्रिया आली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला मिनेसोटा येथे झालेल्या भयानक गोळीबाराबद्दल माहिती मिळाली आहे, जो राज्याच्या खासदारांना लक्ष्य करून केलेला हल्ला असल्याचे दिसत आहे. आमचे ॲटर्नी जनरल, पाम बॉन्डी आणि एफबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत अशी भयानक हिंसा सहन केली जाणार नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world