Donald Trump: राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर बसल्यावर डोनाल्ड ट्रम्प घेणारे 'हे' मोठे निर्णय, भारताबाबत काय?

बेधडक विधानांसह बेधडक आश्वासनं ट्रम्प यांनी दिली आहेत त्यातही महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी आपण महत्त्वाचे निर्देश देऊ असं त्यांनी सांगितलंय.

जाहिरात
Read Time: 6 mins

भरगच्च आश्वासनं देत डोनाल्ड ट्रम्प चार वर्षांच्या ब्रेकनंतर दुसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. आज 20 जानेवारीला ते आपला पदभार स्विकारतील. त्यानंतर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. त्यांनी म्हटलं आहे तसं ते पहिल्याच दिवशी कामाला लागणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी ते बडे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या कडे अमेरिकेचेच नाही तर संपुर्ण जगाचेही लक्ष लागले आहेत. या निर्णयात ते भारताबाबत काय निर्णय घेतात याकडे हे लक्ष असणार आहे. आपण पहिल्याच दिवसापासून म्हणजे 20 जानेवारीपासूनच कामाला लागणार, असं सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प प्रत्येक मुलाखतीतून सांगत आलेत. त्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मोठी आश्वासनं दिली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अवैध घुसखोरांची मायदेशी रवानगी 

ट्रम्प हे कायम घुसखोरांविरोधात राहिले आहेत. त्यामुळे कार्यभार स्वीकारताच आपण मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरांना त्यांच्या मायदेशी धाडून देऊ असं ट्रम्प यांनी प्रचारापासून ते निवडून आल्यानंतरच्या मुलाखतींमधून सातत्यानं म्हटलं आहे. हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं प्रत्यार्पण असेल असं त्यांनी न्यू यॉर्कमधल्या एका प्रचार रॅलीत म्हटलं होतं. त्यामुळे अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांचे धाबे दणाणले आहेत. अमेरिकेतील होमलँड सिक्युरीटी विभागाबाहेर अनेक स्थलांतरितांच्या कागदपत्रांसाठी रांगा लागल्यात. त्यामुळे 20 जानेवारीपूर्वी आपलं स्थलांतरण वैध करण्याची चढाओढ सध्या दिसत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट

जन्मसिद्ध नागरिकत्व बंद 

ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मानंतर मिळणारं अमेरिकन नागरिकत्वच रद्द करण्याचा इरादा जाहीर केला होता. अमेरिकेच्या संविधानात 14 व्या दुरुस्तीनुसार हा अधिकार स्थलांतरितांच्या मुलांना देण्यात आलेला आहे. ज्या मुलांचा जन्म अमेरिकन हद्दीत झालाय त्यांना जन्मतःच अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं. मात्र हा अधिकार आपण रद्द करणारच असं जाहीरपणे ट्रम्प यांनी म्हटलं होतं. बायडन यांची प्रत्येक सीमावर्ती धोरण आपण रद्द करून असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यासाठी आपण ४२ वं शीर्षक वापरू आणि या सार्वजनिक आरोग्य कायद्याच्या आधारे जलदगतीनं प्रत्यार्पण राबवू असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर

कॅपिटल दंगलखोरांना क्षमादान 

सहा जानेवारी 2021 ला अमेरिकेच्या कॅपिटलवर काही ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. अमेरिकेच्या इतिहासातला हा काळा दिवस मानला जातो. मात्र आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी आपण या दंगलखोरांना माफ करणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलं. या दंगलखोरांबाबत त्यांना विचारताच त्यांनी म्हटलं होतं, या जानेवारी सहाच्या दंगलखोरांबाबत आपण पहिल्या नऊ मिनिटांतच निर्णय घेऊ. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयानं बरेच वाद निर्माण झालेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

रशिया युक्रेन युद्ध थांबवणं 

सत्तेत आल्यानंतर रशिया युक्रेन युद्ध थांबवणं हे आपलं प्राधान्य असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यामुळे 20 जानेवारीनंतर खरंच हे तीन वर्षांचं युद्ध थांबतं का याकडे अमेरिकेसह जगाचं लक्ष आहे. सत्तेत आल्यानंतर 24 तासांत आपण हे युद्ध थांबवू असा दावा ट्रम्प यांनी केला होता. कमला हॅरिस यांच्यासह झालेल्या वादविवादांच्या अधिवेशनात त्यांनी आपण झेलेन्स्की आणि पुतीन या दोघांनाही ओळखतो. त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. ते माझा आदर करतात. मात्र बायडन यांचा आदर करत नाहीत, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ट्रम्प यांनी दावा केल्याप्रमाणे ते खरंच आपले संबंध वापरून दोन्ही नेत्यांना माघार घ्यायला भाग पाडतात का हे आता पहावं लागेल.

ट्रेंडिंग बातमी - Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा

आयात शुल्क आकारणी 

मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्कवाढ करण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे मोठे व्यापारी दोस्त राष्ट्र आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे अर्थतज्ज्ञांमध्ये काहीसं काळजीचं वातावरण आहे. अशा अचानक शुल्कवाढीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते असा मतप्रवाह आहे. ट्रम्प यांनी या दोन्ही देशांतील आयात वस्तूंवर 25 टक्के शुल्क आकारणी सुचवलीय.

ट्रेंडिंग बातमी - Wankhede Stadium: रेल्वे ट्रॅकवर बॉल मारा अन् दहा हजार मिळवा, वानखेडे स्टेडियमची आतली गोष्ट काय?

इलेक्ट्रिकल वाहनसक्ती रद्द 

आर्थिक धोरणांबाबत बोलताना ट्रम्प यांनी बायडन यांची इलेक्ट्रिकल वाहनसक्ती योजना बंद करण्याचाही निर्णय बोलून दाखवला होता. ज्या दिवशी मी सत्ता हाती घेईन त्याच दिवशी आपण जो यांचे हे दुष्ट धोरण रद्द करून असे एका प्रचार भाषणात ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. 2030 पर्यंत अमेरिकेला कार्बन उत्सर्जन मुक्त करण्याच्या उद्देशानं हे धोरण बायडन प्रशासन राबवू पाहत होते. मात्र त्याला ट्रम्प यांनी कडाडून विरोध केलाय.

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: ...नंतर पाकिस्तान मुंबईत कधीच खेळलं नाही, 1991 साली वानखेडेवर काय घडलं?

इंधन निर्मितीला चालना 

तर यावर आणखी एक तोडगा त्यांनी सुचवलाय तो म्हणजे इंधन निर्मितीला चालना देणं. अमेरिकेतच ड्रील ड्रील ड्रील म्हणजे खोदा आणि तेल बाहेर काढा असं वक्तव्य ट्रम्प यांनी एका मुलाखती दरम्यान केलं होतं. इंधन निर्मिती वाढवली की दर आपोआप कमी होतील असा त्यांचा विश्वास आहे. मात्र पर्यावरणतज्ज्ञांना त्यांचा हा निर्णय मान्य नाही. इंधन निर्मिती हे पर्यावरणीय बदलांसाठी हानीकारक असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम

ट्रान्सजेन्डर खेळाडूंना महिला वर्गातून वगळणार 

 क्रीडाविश्वासाठी ट्रम्प एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ट्रान्सजेन्डर महिलांना पुरुष म्हणूनच गणलं जाईल असं वक्तव्य वारंवार केलं आहे. सत्तेत आल्यानंतर अशा ट्रान्सजेन्डरना महिलावर्गातून वगळण्याचा निर्णय घेण्याचं आश्वसान दिलं होतं. मी सत्तेत आल्यानंतर अगदी पहिल्याच दिवशी महिलांच्या खेळांमधून मी पुरुषांना बाहेर काढीन. 100 टक्के हा निर्णय राबवणार, असं ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारावेळी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंही नवा वाद निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: शेवटची मॅच वानखेडेवरच का खेळायची होती? सचिननं 'राज' खोललं

जेन्डर अफर्मिंग केअर योजना रद्द करणं 

लिंगपुष्टी एअर योजना रद्द करणं ही आपली प्राथमिकता असेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. जो बायडन यांच्या क्रूर योजनांना मी रद्द करेन असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यापेकी ही एक लिंगपुष्टीची योजना. या त्यांच्या निर्णयामुळे एलजीबीटीक्यू पुरस्कर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. 

मेड ईन अमेरिका ऑटो उद्योग 

अमेरिकन कार उद्योगाबाबतही ट्रम्प यांची ठोस, मतं आहेत.  आपल्या मतांना निर्णयाचा आकार पहिल्याच काही दिवसांत देऊ हे ट्रम्प यांनी वारंवार सांगितलं आहे. ट्रम्पना व्होट म्हणजे अमेरिकेतील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मत असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं होते. अमेरिकन ऊर्जा, अमेरिकन पुरवठा आणि अमेरिकन कामगारांनी तयार केलेली कार असं ट्रम्प यांनी प्रचारावेळी म्हटलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. 

भारत चीनसाठी आनंदाची बातमी 

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतल्यानंतर ते भारत आणि चीनचा सर्वात आधी दौरा करण्यास उत्सुक आहेत. सत्तेत आल्यानंतर चीनवर अतिरीक्त कर लावणार असल्याचे आश्वास दिले होते. त्यांच्या या घोषणे मुळे चीन नाराज होता. अशा स्थिती दोन्ही देशातील संबध ताणले जाण्याची शक्यता आहे. हे पाहात हा तणाव कमी व्हावा यासाठी ट्रम्प चीनला जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ते भारतातही येण्यास उत्सुक आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: भन्नाट किस्से! सुनिल गावस्कर ते अजिंक्य राहणे, वानखेडे स्टेडीयमच्या आठवणीत सगळेच रमले

ट्रम्प यांच्याकडे जगाचे लक्ष 

बेधडक विधानांसह बेधडक आश्वासनं ट्रम्प यांनी दिली आहेत त्यातही महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी आपण महत्त्वाचे निर्देश देऊ असं त्यांनी सांगितलंय. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी पहिल्या दिवशी केवळ एका निर्देशावर स्वाक्षरी केली होती तो निर्देश होता माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची महत्त्वाकांक्षी योजना ओबामा केअर बंद करणं. तर ट्रम्प यांच्या आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सत्तेच्या पहिल्याच दिवशी नऊ निर्देश जारी केले होते. त्यातील सहा निर्देशांद्वारे त्यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळातील सहा निर्णय रद्द केले होते. तर पहिल्या आठवड्यात बायडन यांनी तब्बल 22 निर्देशांवर स्वाक्षरी केली होती. अशाप्रकारे निर्देशांचा सपाटा लावणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. मात्र आता ट्रम्प बायडन यांचा हा रेकॉर्ड मोडतात का , सत्ता हाती घेतल्यानंतर नेमक्या कोणत्या आश्वासनांना ते प्राधान्य देतात. त्यांची अंमलबजावणी ते कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.