जाहिरात
This Article is From Aug 13, 2024

दहावी-बारावीची परीक्षा यंदा लवकर होणार, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

दहावीची परीक्ष 3 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच परीक्षा ही जानेवारीपासून ते 18 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. 

दहावी-बारावीची परीक्षा यंदा लवकर होणार, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

राज्याती दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर होणार आहे. 

दहावीची परीक्षा 3 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच परीक्षा ही जानेवारीपासून ते 18 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. 

असं असेल दहावी-बारावीचं वेळापत्रक

  • दहावी लेखी परीक्षा- 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
  • दहावी प्रॅक्टिकल परीक्षा- 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
  • बारावी लेखी परीक्षा- 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
  • बारावी प्रॅक्टिकल परीक्षा- जानेवारीत सुरु होणार
     

शाळांना परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सूचना देण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांची एवढ्या लवकर घोषणा करण्याची बोर्डाची ही पहिलीच वेळ आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, mahasscboard.in वर उपलब्ध होईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना लवकर परीक्षा आणि निकाल जाहीर झाल्याने फायदा होणार आहे. कारण अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील यामुळे जलद होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
SSC, HSC