जाहिरात

MHADA : म्हाडाची नवीन लॉटरी होणार जाहीर; मुंबईत कोणत्या ठिकाणी मिळणार सदनिका? 

या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MHADA : म्हाडाची नवीन लॉटरी होणार जाहीर; मुंबईत कोणत्या ठिकाणी मिळणार सदनिका? 
मुंबई:

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (MHADA) मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरुवात होणार आहे.

या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदनिका सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.         

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी 12 वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 4 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती 4 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केली जाणार आहे.

सोडतीसाठी आलेल्या अर्जांची यादी 9 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी 9 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी 11 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत 13 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.

नक्की वाचा - तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेवून गेला, हातपाय बांधले अन् पुढे...

मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 370 सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) किंवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवरून अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये  Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, ध्वनीचित्रफिती आणि हेल्प फाईल या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.

उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्‍यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.  मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

Previous Article
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; 'त्या' पोस्टमध्ये सलमानच्या नावाचाही उल्लेख!
MHADA : म्हाडाची नवीन लॉटरी होणार जाहीर; मुंबईत कोणत्या ठिकाणी मिळणार सदनिका? 
sukanya-samriddhi-yojana-ssy-rules-change-how-to-transfer-account-from-grandparents-to-parents
Next Article
सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात मोठा बदल, 'हे' काम करा अन्यथा बंद होईल तुमचं खातं