जाहिरात

वरळीत हिट अँड रन; कोळी दाम्पत्याला भरधाव कारने उडवलं, महिलेचा मृत्यू

Worli Car Accident : कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली.

वरळीत हिट अँड रन; कोळी दाम्पत्याला भरधाव कारने उडवलं, महिलेचा मृत्यू

पारस दामा, मुंबई

मुंबईतील वरळी येथून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे 5.30 च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. 

(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)

अनियंत्रित कार आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच सतर्क झालेल्या पतीने कारच्या बोनेटवर उडी घेतली. मात्र महिलेला तसं शक्य झालं नाही. भरधाव कारने दोघांना धडक देत काही अंतरावर फरफटत नेलं. मात्र पती कारच्या बोनेटवर असल्याने फार दुखापत झाली नाही.

(नक्की वाचा- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश)

अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेनंतर परिसरातील नागरिक या दाम्पत्याच्या मदतीला धावले. महिलेला तातडीने नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना महिलेला मृत घोषित केलं. वरळी पोलिसांना आरोपी चालकाचा अटक केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
दोन मुलांचं अपहरण केलं, चोरी आणि भीक मागायला लावणार होते; असं फुटलं बिंग
वरळीत हिट अँड रन; कोळी दाम्पत्याला भरधाव कारने उडवलं, महिलेचा मृत्यू
Pune will be connected to Samruddhi mahamarg State Government approves Pune-Shirur 6 lane road
Next Article
पुण्याला समृद्धी द्रुतगती महामार्गाला जोडणार, पुणे-शिरूर महामार्गाला राज्य सरकारची मंजुरी