जाहिरात

शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी मोठी आश्वासने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय?

NCP Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसने 'माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत दिली जाणारी रक्कम सध्याच्या 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना करण्याचं आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.

शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी मोठी आश्वासने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात काय?

देवा राखुंडे, बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसने आज निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अजित पवार यांनी बारामतीत जाहीरनाम्याचे अनावरण केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते गोंदियात जाहीरनाम्याचे अनावरण करण्यात आले.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी अजित पवारांनी म्हटलं की, युतीचा जाहीरनामा येणार आहे पण पक्ष म्हणून पक्षाचा जाहीरनामा आम्ही देत आहोत. आम्ही विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीरनामा देत आहोत. आमच्या पक्षाचा आणि माझं काय व्हिजन असणार हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही त्यातून केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?

यंदा मी वेगळा दृष्टिकोन ठेवून हा जाहीरनामा बनवला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार उभे आहेत तिथला जाहीरनामा वेगळा असेल. प्रत्येक भागाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. शेतकरी कष्टकरी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या गरजांना या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसने 'माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत दिली जाणारी रक्कम सध्याच्या 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे. तर वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये प्रति महिना करण्याचं आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे.

(नक्की वाचा-  'आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो', शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन; भाषणाची जिल्ह्यात चर्चा!)

राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील आश्वासने 

  • महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात 45000 जोड रस्ते जोडण्याचे आश्वासन
  • लाडकी बहीण योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
  • 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी 10000 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन
  • महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांची पोलीस दलात भरती
  • धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन
  • शेतकऱ्यांच्या पिकांच्या एमएसपीमध्ये 20 टक्के वाढ करणार
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न
  • वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणार
  • राज्यात 25 लाख रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करणार
  • शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन
  • वीज बिलात 30 टक्के कपात करण्याचे आश्वासन
  • सौरऊर्जेला प्राधान्य देण्याचे आश्वासन
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये मासिक वेतन
  • प्रशिक्षणाद्वारे 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांची मासिक शिष्यवृत्ती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com