
निनाद करमरकर, बदलापूर
बदलापूर एमआयडीसीमध्ये कंपनी मालकांनीच ग्रीन बेल्टची जागा लाटत त्यावर कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे. या कंपन्यांवर एमआयडीसीने कारवाई करण्याची मागणीही संभाजी शिंदे यांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एमआयडीसीतील प्रदूषण नियंत्रणात राहावं, यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रात ग्रीन बेल्ट तयार करण्यात येतो. बदलापूर एमआयडीसीत 2022 च्या विकास आराखड्यानुसार 50 ते 60 एकरांचा पट्टा हा ग्रीन बेल्ट म्हणून दाखवण्यात आला आहे. प्रत्येक कंपन्यांच्या बाजूला ठराविक जागा ही झाडं लावण्यासाठी सोडण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)
मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता कुठेही मोकळी जागा दिसत नसून ग्रीन बेल्टच्या जागेवर कंपन्यांनी अतिक्रमण करून आपल्या कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Nashik News : डीजेच्या आवाजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू? नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार)
बदलापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून त्यांच्यातून होणारं वायू प्रदूषण ग्रीन बेल्टमुळे कमी होऊ शकतं. त्यामुळे ग्रीन बेल्टवर अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर एमआयडीसीने कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे.