देवा राखुंडे, बारामती
बारामती तालुक्यातील मेडद गावात असलेल्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे आहेत. बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या सर्च ऑपरेशनची बारामतीत चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात हे सर्च ऑपरेशन करण्यात आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत बारामतीचे विभागाचे मुख्य निवडणूक निर्णय वैभव नावडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात काही तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या नेमण्यात आलेल्या एका विशिष्ट पथकाकडून विविध ठिकाणी तपासण्या करण्यात येतात. त्याच पद्धतीने शरयू टोयाटो कंपनीची देखील तपास करण्यासाठी पथक गेले होते. त्या ठिकाणी कोणतीही रक्कम अथवा काहीही आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world