जाहिरात

बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी काहीही झाले तरी मी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका याआधीच जाहीर केलेली आहे. 

बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?

स्वानंद पाटील, बीड

बीड विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार असल्याने महायुतीचा उमेदवार निवडीबाबत चांगलाच कस लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड विधानसभेवर दावा केला गेला असला तरी महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप व शिवसेना या जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतल्या प्रत्येक पक्षाचा उमेदवार दंड थोपटून बसलेला आहे. यामुळे बीड विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यायची? असा पेच महायुतीत निर्माण झालेला दिसून येत आहे. 

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी काहीही झाले तरी मी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका याआधीच जाहीर केलेली आहे. 

(नक्की वाचा-  महायुती-महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार? या छोट्या पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक)

तर बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांनी देखील बैलगाडा शर्यतीत माझा बैलगाडा विधानसभेत धावणार असून त्याला बैल कुठले असतील हे मात्र सांगता येणार नाही, असे म्हणत भाजपला जणू सूचक इशाराच दिला आहे. 

त्यातच युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांनी नुकतेच बीडमध्ये शक्तीप्रदर्शन केले. युवासेनेच्या मेळाव्यातील बॅनरवर शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांचे फोटो न टाकल्याने बीडमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तर बीड विधानसभेत शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह असेल युवासेना - शिवसेनेमधील गटबाजी मिटवण्यासाठीच मी आलो असल्याचं म्हणत सरनाईक यांना गटबाजीवर पडदा टाकावा लागला होता.

(नक्की वाचा- भाजपाचे मुंबईतील विद्यमान आमदार रेड झोन मध्ये ? 'या' आमदारांचा पत्ता कट होणार?)

चांगले काम करत असेल त्यांची शिफारस आम्ही करतो आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील, असं म्हणत बाजीराव चव्हाण यांच्या बीड विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात देखील सूचक वक्तव्य पूर्वेश सरनाईक यांनी केलं होत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
'निर्बुद्ध आदित्य ठाकरे शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते', आशिष शेलारांचा घणाघात
बीड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच, कुणाला मिळणार उमेदवारी?
my-family-wants-justice-baba-siddiquis-son-mla-zeeshan-siddiqui-first-reaction-on-his-post
Next Article
'माझ्या कुटुंबाला न्याय हवाय' बाबा सिद्दीकीच्या हत्येवर मुलगा झीशानची पहिली प्रतिक्रिया