जाहिरात

भाजपाचे मुंबईतील विद्यमान आमदार रेड झोन मध्ये ? 'या' आमदारांचा पत्ता कट होणार?

भाजपच्या अंतर्गत सर्वेत हे आमदार रेड झोनमध्ये असल्याने त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पाच विद्यमान आमदारांचा त्यात समावेश असल्याचे बोलले जात आहे.

भाजपाचे मुंबईतील विद्यमान आमदार रेड झोन मध्ये ? 'या' आमदारांचा पत्ता कट होणार?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारींची यादी तयारी केल्याचे समोर येत आहे. त्याची अधिकृत घोषणा काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपमधील अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. त्यात मुंबईतल्या काही विद्यमाना आमदारांचा समावेश आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेत हे आमदार रेड झोनमध्ये असल्याने त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पाच विद्यमान आमदारांचा त्यात समावेश असल्याचे बोलले जात आहे. शिवाय काही विद्यमान आमदारांचे मतदार संघ बदलण्याची चर्चाही सध्या रंगली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईतल्या पाच भाजप आमदारांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहे. भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जातो. तसा या निवडणुकीतही होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतल्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार आहे, त्यात वर्सोवाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर, घाटकोपर पश्चिमेचे राम कदम, सायनचे तमील सेलव्हन, घाटकोपर पूर्व मधून पराग शाह आणि बोरिवलीचे सुनिल राणे यांचा पत्ता कट होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?

भारती लव्हेकर या मतदार संघात तेवढ्या सक्रीय नाही. शिवाय गेल्या पाच वर्षात त्या आपली छाप पाडू शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची लक्षणे आहेत. बोरिवलीत सुनिल राणे यांना स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध होत आहे. सुनिल राणे हे मुळचे वरळीचे आहेत. त्यांना ऐन वेळी बोरिवलीतून गेल्यावेळी उमेदवारी दिली होती. आता या मतदार संघातून गोपाळ शेट्टींना उमेदवारी द्यावी अशी मागणी होती. लोकसभेला शेट्टी यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्याचे बक्षिस म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  मोबाइलवर मालिका पाहू नको, आईने लेकाला हटकले, लेकाने भयंकर कृत्य केले

सुनिल राणे यांच्या प्रमाणे घाटकोपर पश्चिमेचे राम कदम यांच्याबाबतही नाराजी आहे. ते पहिल्या ऐवढे सक्रीय ही दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचाही पत्ता कट होणार असे बोलले जाते. तर घाटकोर पूर्व मधून माजी मंत्री प्रकाश मेहता हे भाजपकडून इच्छुक आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची भूमीका मांडली आहे. विद्यमान आमदार पराग शहा यांना त्यांचा विरोध आहे. ते मतदार संघा सक्रीय नसतात असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे पराग शहा यांचाही पत्ता कट होवू शकतो. तर सायन मधून तमील सेलव्हन यांना ही उमेदवारी नाकारली जाईल अशी स्थिती आहे.   

Previous Article
मुख्यमंत्रिपदासाठी पवारांची पहिली पसंती कोण? थेट संकेत दिले, 'त्या' नेत्याचे स्वप्न पूर्ण होणार?
भाजपाचे मुंबईतील विद्यमान आमदार रेड झोन मध्ये ? 'या' आमदारांचा पत्ता कट होणार?
how-us-president-election-scene-changed-after-joe-biden-withdraws-donald-trump-benefiting-or-losing-due-to-the-arrival-of-kamala-harris
Next Article
अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाला बदल? कमला हॅरिसमुळे ट्रम्प यांना फायदा की तोटा?