स्वानंद पाटील, बीड
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात (SIT) मोठा बदल करण्यात आला आहे. एसआयटीमधील अनेक अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालीच ही एसआयटी असणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एसआयटीमधील अधिकारी बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. देशमुख कुटुबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील एसआयटीमधील अधिकारी बदलण्याची मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्त्यांना अंजली दमानिया यांनी देखील हीच मागणी केली होती.
(नक्की वाचा- बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा पुण्याlतील विद्यार्थ्यांना मनस्थाप; तरुणांनी रडून सांगितले अनुभव)
नवीन विशेष तपास पथक (SIT)
- किरण पाटील (अपर पोलीस अधिक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)
- अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)
- सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)
- अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
- शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग,महाराष्ट्र राज्य, पुणे)
- दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
(नक्की वाचा- Satara News : सातारा जिल्ह्याचं नाव बदलणार? DCM एकनाथ शिंदे काय म्हणाले?)
जुने विशेष तपास पथक (SIT)
- अनिल गुजर - पोलीस उपअधीक्षक
- विजयसिंग शिवलाल जोनवाल स.पो. निरीक्षक
- महेश विघ्ने - पो.उ.निरीक्षक
- आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
- तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक
- मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार
- चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक
- बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक
- संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world