रामराजे शिंदे, नवी दिल्ली
Rajyasabha Election BJP Candidate : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आज अधिकृत पत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली असून यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि रिपाइं पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नावांचा समावेश आहे.
राज्यसभेसाठी भाजपचे 4 उमेदवार
रामदास आठवले
केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (आठवले) गटाचे प्रमुख रामदास आठवले यांना भाजपने आपल्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी दिली आहे.
विनोद तावडे
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे या निमित्ताने संसदेत पुनरागमन होत आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)
माया चिंतामण इवनाते
नागपूरच्या माजी महापौर आणि भाजपच्या आदिवासी महिला नेत्या माया ईवनाते यांना उमेदवारी देऊन पक्षाने आदिवासी समाजाला मोठे प्रतिनिधित्व दिले आहे.
रामराव वडकुते
धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनाही राज्यसभेची संधी देऊन भाजपने सामाजिक समीकरणे साधली आहेत.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
सामाजिक आणि प्रादेशिक समतोल
भाजपने माया ईवनाते आणि रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. रामराव वडकुते यांच्या रूपाने ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. विनोद तावडे यांच्या रूपाने एक आक्रमक आणि अनुभवी मराठा नेता संसदेत पाठवला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world